Monday, August 30, 2010

 'सकाळ टाइम्स' मध्ये  दिनांक ३० ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झालेली बातमी -- सविस्तर वाचा 

Tuesday, August 24, 2010

प्रकाशन सोहळा 
'कायदा माहितीचा अन अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा' 
'कायदा माहितीचा  अन  अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा' या पुस्तकाचे नुकतेच दिनांक २३ ऑगस्ट २०१० रोजी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य श्री. जे. पी. डांगे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 सुप्रीम कोर्टाचे विविध न्याय निर्णय, माहितीच्या अधिकाराखाली वेगवेगळ्या परिस्थितीत वापरावयाचे विविध नमुने, अतिशय सोपी भाषा, व्यक्ती स्वातंत्र्य व माहितीच्या कायद्याचा संबंध स्पष्ट करणारे अतिशय सुलभ भाषेतील हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये माहिती अधिकाराबद्दल जिज्ञासू असलेल्या नागरिक तसेच प्रत्यक्ष माहिती अधिकारी, जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी या सर्वांनाच या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल.

Wednesday, August 18, 2010

नवीन आगमन - 'शेतक-यांनो... जमिनी सांभाळा!'

शेतक-याला आपल्या जमिनीबद्दल अनेक वेळा निर्णय घेता येत नाही. भाउबंदकी, सामाजिक नात्यामधील गुंतागुंत, निर्णय घेण्याची अपुरी क्षमता, फसण्याची शक्यता अश्या अनेक मुद्यांमुळे स्वतःचा निर्णय  स्वतःला घेता येत नाही. अश्या वेळी मित्रत्वाच्या नात्याने शेतक-यांना स्वतःची जमीन कशी सांभाळावी हे सांगणारे 'शेतक-यांनो... जमिनी सांभाळा!' हे पुस्तक आहे. 

औद्योगिकीकरण, शहरीकरण, सेझ या अशा गोंधळात सापडलेल्या शेतक-याला या पुस्तकामुळे मालमत्तेबद्दलची स्वतःची भूमिका स्वतःच ठरविता येते.

Friday, August 13, 2010

Blog

'घरपोच धान्य योजना' ही महाराष्ट्राला वरदान होऊ शकेल.  तसेच माहितीच्या कायद्याचे नविन पुस्तक आम्हा सर्वाना खुप उपयोगी पडेल... सुमेरकुमार काले, नाशिक
 

माझी प्रकाशित पुस्तके

१. शेतक-यांनो...जमिनी सांभाळा!

२. कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा

३. Home Delivery Scheme of Foodgrains

४. घरपोच धान्य योजना

५. महसूल अधिका-यांचे अर्धन्यायिक कामकाज

६. शेतीचे कायदे

७. फेरफार नोंदी

८. शेतक-यांनो सावधान

९. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति






नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)