प्रकाशन सोहळा
'कायदा माहितीचा अन अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा'
'कायदा माहितीचा अन अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा' या पुस्तकाचे नुकतेच दिनांक २३ ऑगस्ट २०१० रोजी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य श्री. जे. पी. डांगे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सुप्रीम कोर्टाचे विविध न्याय निर्णय, माहितीच्या अधिकाराखाली वेगवेगळ्या परिस्थितीत वापरावयाचे विविध नमुने, अतिशय सोपी भाषा, व्यक्ती स्वातंत्र्य व माहितीच्या कायद्याचा संबंध स्पष्ट करणारे अतिशय सुलभ भाषेतील हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये माहिती अधिकाराबद्दल जिज्ञासू असलेल्या नागरिक तसेच प्रत्यक्ष माहिती अधिकारी, जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी या सर्वांनाच या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल.
No comments:
Post a Comment