Friday, March 4, 2011

माहिती अधिकाराची गीता...

नुकतीच मंत्रालयीन अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी 'माहितीचा अधिकार' या विषयावर कार्यशाळा  संपन्न झाली. त्यातील एका प्रशिक्षणार्थ्याचे मनोगत महान्यूजमध्ये प्रसिद्ध झाले असून त्यात 'कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्राचा!' या पुस्तकाचा उल्लेख माहिती अधिकाराची गीता असा केला आहे. सदर मनोगतातील काही भाग :
 
"या प्रशिक्षण कार्यशाळेत आम्हा सर्वांना काही पुस्तकेही देण्यात आली. त्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे यांनी प्रकाशित केलेले, प्रल्हाद कचरे आणि शेखर गायकवाड लिखित कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा या पुस्तकास तर माहिती अधिकाराची गीता म्हटले तर निश्चितच काहीही वावगं ठरणार नाही. इतकं ते पुस्तक अप्रतिम आहे. या कार्यशाळेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. अगदी वेळेवर सुरुवात, वेळेवर चहा, वेळेवर जेवण, व्याख्यात्यांचं वेळेवर आगमन, सर्व काही अगदी काटेकोरपणे. व्यवस्थापनाच्या बाबतीत यशदा ही संस्था नेहमीच यशस्वी ठरली आहे. आपल्यालाही त्यांचा अनुभव आला असेलच किंवा भविष्यात येईलही"...मनोज सानप, प्रशिक्षणार्थी
 
Source: http://www.mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=msLsOxlsEZ6|p53wzRS1WoqkP0wl9rt6xAvuMygS9EqmUqy3jzjHbQ==

No comments:

माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)