Monday, July 18, 2011

यशवंत गौरव देवमामलेदार पुरस्‍कार-२०११नाशिकपासून अवघ्या ९० किमी अंतरावर असणारे सटाणा (बागलान), येथील यशवंत महाराज मंदीर हे या पंचक्रोशीतील आराध्य दैवत मानले जाते. सन १८६९ साली प्रशासकीय कामकाज अतिशय चोख आणि न्यायाला धरुन कार्य करणा-या सात्विक अशा सटाण्याच्या मामलेदारांनांचा लोक 'देवमामलेदार' म्हणून ओळखू लागले. महाराष्ट्रात सरकारी अधिका-यांचे मंदीर सटाण्याशिवाय अन्य ठिकाणी नाही.

साईबाबांचे समकालीन असणा-या देवमामलेदारांच्या नावे दिला जाणारा 'यशवंत गौरव देवमामलेदार पुरस्कार  - २०११' मला नुकताच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या हस्ते सटाणा येथे देण्यात आला. शेतक-यांसाठी व सामान्यांसाठी मनापासून काम करण्यासाठी हा पुरस्कार निश्चितपणे मला स्फूर्ती देईल.

Friday, July 8, 2011

सातबारा वेबसाईट अभिप्राय

आदरणीय श्री शेखर सर,

आपली website सातबारा.को.इन (www.satbara.co.in) हि अतिशय उत्कृष्ट व मार्गदर्शनपर असून खूप आनंद वाटला. आपल्या सारख्या अधिका-यांकडून शेतकरी जनतेला हीच अपेक्षा आहे...

आपल्या ह्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!!!


धन्यवाद.

डॉ. प्रशांत रामदास पाटील 
नाशिक

Monday, July 4, 2011

घरपोच धान्य योजनेस अकोले या आदिवासी तालुक्यातून उत्सफुर्त प्रतिसाद


अहमदनगर जिल्ह्यात घरपोच धान्य योजना सुरु झाल्यानंतर आदिवासी दुर्गम अशा अकोले तालुक्यातून आदिवासींनी या योजनेचे अतिशय उत्सफूर्त स्वागत केले आहे. 

या योजनेमध्ये आतापर्यंत ७८ गावांनी सहभाग नोंदवला असून या आदिवासी तालुक्यातील ७०% भाग घरपोच धान्य योजनेखाली पूर्ण झाला आहेएकूण १०,००० कुटुंबांनी १०,००० क्विंटल धान्य घेतले अशी माहिती प्रांताधिकारी संगमनेर श्री जितेंद्र काकुस्ते यांनी दिली.

यावरुनच गरिबांसाठीच्या या योजनेचे ख-या अर्थाने चीज झाले असे म्हणता येईल...

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)