Thursday, August 16, 2012

घरपोच धान्य योजना दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर...

सध्या समाजात अपयशी किंवा वाईट गोष्टीबाबत चर्चा होताना दिसते. ते ऐकून, सध्या कुठेही काहीही सकारात्मक किंवा चांगलं घडतंय की नाही असा प्रश्न सर्वांना पडावा, त्याच दृष्टिकोनातून  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर जनता दरबार ही मालिका दिनांक २० ऑगस्ट २०१२ पासून सुरु होत आहे. 

जनता दरबारमध्ये निरनिराळया सकारात्मक चांगल्या आणि यशस्वी प्रयोगांची दखल घेण्यात असून त्या-त्या प्रयोगांच्या प्रयोगकर्त्यांची ओळख करुन देण्यात आली आहे. प्रयोगामागची प्रेरणा, संकल्पना, अभ्यास, मांडणी, आराखडा, अडीअडचणी, लाभार्थी, मनोगत आणि अंमलबजावणी इ. विविध मुद्दे यामध्ये मांडण्यात आलेले आहेत.

जनता दरबारच्या पहिल्या भागात शेखर गायकवाड, सहसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या घरपोच धान्य योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ही योजना सध्या कार्यान्वित झालेली आहे आणि त्यातून शासन, प्रशासन आणि जनता ह्या तीनही घटकांना लाभ मिळत आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या गैरव्यवहारांना यातून आळा बसत आहे हे कसं काय शक्य आहे? हे  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर जनता दरबार या मालिकेच्या पहिल्या भागात आपल्याला पहायला मिळेल.

प्रसार साहित्य (Promo) पाहण्यासाठी क्लीक करा : 


सोमवार, दिनांक २० ऑगस्ट २०१२ रोजी रात्री १० ते १०.३० वा या कालावधीत हा भाग प्रसारित होईल. तसेच या भागाचे पुन:प्रसारण शुक्रवारी सकाळी ८ ते ८.३० या कालावधीत होणार आहे.

No comments:

माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)