Friday, November 16, 2012

शेखर गायकवाड लिखित - 'प्रशासनाच्या नव्या वाटा' प्रकाशनाच्या वाटेवर...

शालेय जीवनात उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असणारे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येऊन देखील, प्रशासकीय व्यवस्था त्याप्रमाणात जर सुधारणार नसेल तर त्यासाठी निश्चितच काही अतिरिक्त क्षमता व कौशल्य प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही. 

शासकीय नोकरीच्या चौकटीत आपण काही नवनिर्मिती करु शकतो असा विश्वास अपवादानेच दिसून येतो. काही थोडया अधिका-यांमध्ये असा उत्साह नोकरीच्या सुरुवातीला दिसतो. घर, कार्यालय, संसार, इतर जबाबदा-यांशी तडजोड करता-करता पुढे-पुढे तो कमी होत जातो.

उपजत कल्पनाशक्तिचा विसर पडू नये म्हणून शासन सेवेत असलेल्या व नव्याने दाखल होणा-या अधिका-यांसाठी काही निवडक नाविन्यपूर्ण प्रयोग शेखर गायकवाड लिखित 'प्रशासनाच्या नव्या वाटा' या पुस्तकाच्या माध्यमातून लवकरच प्रकाशित होत आहेत.

Saturday, November 3, 2012

भारत आंधळे लिखित 'गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास' या पुस्तकाचे प्रकाशन...


शनिवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०१२ रोजी महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे शनिवारी स्टडी सर्कलतर्फे सहायक आयकर आयुक्त भरत आंधळे लिखित 'गरूडझेप : एक ध्येयवेडा प्रवास' या पुस्तकाचे प्रकाशन चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव श्री शेखर गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रकाशन सोहळयास नाशिक वृत्तपत्रातील आवृत्यांमध्ये प्रकाशित श्री शेखर गायकवाड यांचे मार्गदर्शनपर भाषणासाठी क्लीक करा :
१) दैनिक गावकरी, नाशिक
२) दैनिक महाराष्ट्र टाईम्स, नाशिक
३) दैनिक सकाळ, नाशिक
४) दैनिक दिव्य मराठी, नाशिक

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)