Tuesday, December 4, 2012

पुस्तक प्रकाशन सोहळा - प्रशासनाच्या नव्या वाटा.रविवार, दिनांक २ डिसेंबर २०१२ रोजी पुणे येथे राज्य नागरी सेवा अधिकारी महासंघाच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार या संवर्गातील अधिका-यांच्या या परिषदेस मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , महसूल व पणन राज्यमंत्री प्रकाश सोळंके , विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख , जिल्हाधिकारी विकास देशमुख , संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे , बी. डी. शिंदे , माजी निवृत्त अधिकारी व्ही. पी. राणे आदी उपस्थित होते.


या परिषदेत नव्या-नव्या वाटा शोधणा-या व प्रशासकीय सेवेत दाखल होणा-या तरुण अधिका-यांना प्रेरणादायी ठरु शकेल अशा शेखर गायकवाड लिखित 'प्रशासनाच्या नव्या वाटा' या पुस्तकाचे प्रकाशन  मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.


प्रशासकीय सेवेत नव्याने येणा-या अधिका-यांना एक नवी दृष्टी मिळावी या हेतूने श्री शेखर गायकवाड यांनी राबविलेल्या असंख्य लोकाभिमुख प्रशासकीय प्रयोगांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. जसे मनुष्यबळ व्यवस्थापन, पारदर्शक न्याय निर्णय प्रक्रिया, गाव पातळीवरील प्रश्न थेट सोडविण्याचा प्रश्न, रस्ता रुंदीकरण, आपत्ती व्यवस्थापन, लोकसहभागातून श्रमसंस्कार, तात्पुरती रेशनकार्डे, शेतक-यांसाठी वाचनालये, कायदेविषयक साक्षरता, प्रशिक्षणातून प्रबोधन, स्पर्धा परीक्षा, इंटरनेटद्वारे ज्ञानप्रसार इ. 

दैनिक वृत्तपत्रातील बातमीसाठी क्लीक करा :नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)