Friday, January 18, 2013

राज्य नागरी सेवेतील १० अधिका-यांचे भारतीय प्रशासकीय सेवेत नामनिर्देशन

पुणे: दिनांक 17 जानेवारी, 2013 रोजी केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध करून महाराष्ट्रातील श्री प्रकाश ठुबे, श्री टी जी कासार, श्री शेखर गायकवाड, श्री व्ही एन कळम, श्री एस एम काकानी, श्री के डी निंबाळकर, श्री एस एन भांगे, श्री ए एम कवडे, श्री एस एम चेन्ने व श्री ए बी मिसाळ यांना भारतीय प्रशासकीय सेवेत नामनिर्देशित केले असल्याचे अधिसूचित केले आहे या सर्व अधिकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व उत्कृष्ट कामासाठी हार्दीक शुभेच्छा!!!

Thursday, January 17, 2013

चौथे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन...

दिनांक ११ ते १३ जानेवारी २०१३ रोजी नाशिक येथे श्री शेखर गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली चौथे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पार पडले. त्यासंबंधी प्रकाशित वृत्त व छायाचित्रे :

सकाळ - स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आजपासून

लोकसत्ता - स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनास आज ग्रंथदिंडीने प्रारंभ

लोकमत - आजपासून स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन

देशदूत - महाराष्ट्रातून प्रशासकीय अधिकारी घडावे : भुजबळ

ऍ़ग्रोवन - नाशिकला स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनास प्रारंभ

महाराष्ट्र टाईम्स - स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे

दिव्यमराठी - स्पर्धा परीभा साहित्य संमेलन : ग्रामीण भागात सेवेची खरी संधी
Thursday, January 10, 2013

दै. सकाळ मधील प्रकाशित मुलाखत...

महाराष्ट्रीय विद्यार्थी देशात सर्वप्रथम यावा!
सिद्धेश्‍वर डुकरे, मुंबई
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीत प्रवेश करावा, हे विद्यार्थी राजपत्रित अधिकारी म्हणून अथवा केंद्रीय स्तरावर अखिल भारतीय सेवेत यशस्वी व्हावेत, यासाठी त्याला पूरक वातावरण मिळावे, त्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षांबाबत जाणीव आणि जागृती निर्माण व्हावी, यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये लोकाभिमुख प्रशासन करण्याची अंगभूत जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने गेली तीन वर्षे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यंदा नाशिक येथे 11, 12 आणि 13 जानेवारीस हे संमेलन होत आहे. त्याच्या अध्यक्षस्थानी आहेत मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव शेखर गायकवाड. या संमेलनाबद्दल त्यांच्याशी झालेली बातचीत...


अशा प्रकारच्या संमेलनाचा विचार कसा सुचला?

गायकवाड : निरनिराळी संमेलने होत असतात. त्या संमेलनांना लहान मुलांसह पालक आणि ज्येष्ठ मंडळी येत असतात, असे आमचे निरीक्षण आहे; मात्र तरुण वर्ग कोठेही दिसत नव्हता. या वर्गाला कोठेतरी "रिलेट' करायला हवे. त्यांच्याशी त्यांच्या "करिअर' आणि "अँबिशन'विषयी बोलायला हवे. तसेच पैसा, वशिला, वारसा याच्यापलीकडे जाऊन स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाले, तर तुम्ही प्रशासनात सर्वोच्च स्थानी पोचू शकता, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी अशा प्रकारचे संमेलन घेणे आवश्‍यक वाटू लागले. त्यातून या संमेलनाचा जन्म झाला. 

मागील तीन वर्षांचा संमेलने भरविण्याचा अनुभव कसा होता? 

गायकवाड : पहिले संमेलन आम्ही 2010 मध्ये पुण्यात भरवले होते. 65 हजारांवर विद्यार्थ्यांनी संमेलनाला हजेरी लावली. त्यानंतर 2011 मध्ये औरंगाबाद, 2012 मध्ये नागपूर आणि आता नाशिक येथे हे संमेलन होत आहे. प्रत्येक संमेलनाने सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येचा उच्चांक मोडला आहे. यंदाही लाखाच्या वर विद्यार्थी येणे अपेक्षित आहे.


संमेलनामागील आपली भूमिका काय आहे?

गायकवाड : महाराष्ट्रात गुणवत्तेची वानवा नाही. आपले विद्यार्थी सर्व प्रकारच्या परीक्षांत देशात चमकतात; मात्र त्यांना गरज आहे ती योग्य पद्धतीचे वातावरण मिळण्याची. दहावी-बारावीला बोर्डात आलेले विद्यार्थी वीस वर्षांपूर्वी डॉक्‍टर, इंजिनिअर कोर्सला जात असत. नंतर परदेशात जायला लागले. मग आयटी क्षेत्राकडे वळू लागले; मात्र प्रशासकीय सेवेत येण्याचा तरुणांचा ओढा कमी होता... अजूनही कमीच आहे. म्हणूनच ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पूरक वातावरण मिळणे गरजेचे आहे. प्रत्येक परीक्षेच्या स्वरूपाप्रमाणे शिकवण्या, अभ्यासाची पुस्तके मिळणे आवश्‍यक आहे. नव्वदच्या दशकापर्यंत महाराष्ट्रात वातावरण नव्हते. आता खूपच फरक पडला आहे.


स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सरकारी पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत? 

गायकवाड : शासनाने सनदी सेवेचे मार्गदर्शन करणारी केंद्रे उभारली आहेत. मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर येथे ही केंद्रे आहेत. विद्यापीठातही अशा प्रकारची केंद्रे आहेत. पुण्यात "यशदा' आहे. त्याची व्याप्ती अजून वाढवायला हवी, असे वाटते.


एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काय सांगाल?

गायकवाड : स्वातंत्र्यापूर्वी आयसीएस परीक्षेत सी.डी. देशमुख यांनी घवघवीत यश मिळवले होते. आधुनिक महाराष्ट्रातील विद्यार्थी आयएएस परीक्षेत अद्याप सर्वप्रथम आला नाही. तो यावा, ही अपेक्षा आहे.

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)