Tuesday, May 14, 2013

नाशिक वसंत व्याख्यानमालेत गुंफलेले १२ वे पुष्प...प्रॉपट्री आणि माणूस


दै. लोकमत (१२.०५.२०१३)

दिनांक १ मे २०१३ पासून नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या ८८व्या वर्षाच्या ज्ञानसत्राचा शुभारंभ झाला. या व्याख्यानमालेत प्रॉपट्री आणि माणूस या विषयावर श्री शेखर गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते :

संघर्षातून झाला माणसाचा विकास - शेखर गायकवाड

प्राचीन काळापासून जमिनीच्या वादातून अनेक संघर्ष झाल्याचे दिसून येत असून, लाखो वर्षांनंतरही त्यात फरक पडलेला नाही, आधी त्यासाठी युद्ध झाले तर आता न्यायालयीन युद्ध लढले जात असल्याचे उद्गार मुख्यमंत्री कार्यालयाचे संयुक्त सचिव शेखर गायकवाड यांनी केले. नाशिक वसंत व्याख्यानमालेत आप्पासाहेब कुलकर्णी यांच्या स्मृतिनिमित्त १२ वे पुष्प गुंफतांना ते ‘प्रॉपर्टी आणि माणूस’ या विषयावर ते बोलत होते. 

ते म्हणाले लाखो वर्षांच्या इतिहासानंतरही सगळी लढाई जमिनीसाठीच सुरू आहे. पूर्वी डोंगरावर वस्ती करून राहणार्‍या मानवाला अन्न कमी पडू लागल्याने तो शेतीकडे वळला. डोंगरावर शेती करताना नदीशेजारी केल्यास ती फायदेशीर ठरते हे कळल्यानंतर तो नदीकिनारी स्थिरावला. त्यामुळे सर्व संस्कृती नदीकिनारी विकसित झाली. त्यानंतर टोळ्याने राहणार्‍या माणसांचे जमिनीसाठीच युद्ध सुरू झाले. त्या टोळीचा प्रमुख नंतर राजामध्ये परावर्तित झाला. या राजांमध्ये मग शस्त्रांची युद्धे झाली, तीही जमिनीच्या भागांसाठीच. महाभारत हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचेही ते म्हणाले. आधुनिक युगात जमिनींसाठी भांडणे सुरू आहेत. कायदे बदलले तरी माणसे मात्र तशीच आहेत. लाखो वर्षांमध्ये त्यात काहीही फरक पडलेला नाही हे सांगण्यासाठी गायकवाड यांनी शेतीसाठी सुरू असलेल्या वादांचा आणि त्यासाठी लावलेल्या वकिलांचे अनेक किस्से सांगून श्रोत्यांना हास्यात डुंबविले.

No comments:

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)