Monday, May 13, 2013

थेट घरपोच भाजीपाला उपक्रम...

फार्म फीस्ट (ग्रीनफिल्ड अँग्रो सर्व्हिसेस) या संस्थेतर्फे थेट घरपोच भाजीपाला देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभाप्रसंगी श्री शेखर गायकवाड...

दै. दिव्यमराठी (१२.०५.२०१३)
ग्राहकांनी मानसिकता बदलावी 

ग्राहक सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना भाव करीत नाहीत, मात्र भाजीपाल्यासाठी घासाघीस केली जाते. आता शहरातील ग्राहकांना स्वच्छ व ताजा भाजीपाला घरपोच मिळत असल्याने मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे संयुक्त सचिव शेखर गायकवाड यांनी केले.


फार्म फीस्ट (ग्रीनफिल्ड अँग्रो सर्व्हिसेस) या संस्थेतर्फे थेट घरपोच भाजीपाला देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ झाला. त्यावेळी गायकवाड म्हणाले की, शेतकर्‍यांनीदेखील ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना हवा तसा भाजीपाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. युरोपात शेतकरी भाजीपाला मार्केटिंग करतात. मात्र, आपल्याकडे त्याची कमतरता असल्याने शेतकर्‍यांना अजूनही भाजीपाला विक्रीसाठी संघर्ष करावा लागतो. क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम, प्रकल्प संचालक (आत्मा) सुभाष नागरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

No comments:

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)