Friday, February 20, 2015

सात-बारावर आता 'आधार' क्रमांक

सकाळ, पुणे - बनावट सात-बारा आणि त्याआधारे होणाऱ्या फसवणुकीस आळा घालण्यासाठी यापुढे सात-बारा उताऱ्यावर संबंधित जमीनमालकाचा आधार कार्ड क्रमांक टाकण्याचा विचार महसूल प्रशासनाने सुरू केला आहे. त्यामुळे दस्त नोंदणीच्या वेळेस जमीनमालकाची ओळख पटण्यास मदत होणार आहे.

विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्‌ यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. बनावट सात-बारा उतारा अथवा जमिनी मालकांच्या नावाशी साधर्म्य असलेली व्यक्ती उभी करून जमिनीची खरेदी विक्रीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातून मोठे न्यायालयीन वाद निर्माण होत असून, दाव्यांची संख्याही वाढत आहे. त्यास आळा बसावा, जमीनमालकांची तसेच खरेदीदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी उताऱ्यावर आधार कार्ड क्रमांक टाकण्याचा विचार सुरू आहे. 

चोक्कलिंगम म्हणाले, "दस्त नोंदणी कार्यालयात बायोमेट्रिक सिस्टिम पूर्वीपासूनच आहे. सातबाऱ्यावर आधार नंबर दिल्यास दस्त नोंदणीच्या वेळी नोंदणी निरीक्षकांना मालकी हक्काची खात्री करून घेणे सोयीचे होईल. पुणे शहर व जिल्ह्यात सुमारे 76 टक्‍के लोकांचे आधार कार्ड नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सातबाऱ्यावर आधार कार्डचा नंबर टाकणे शक्‍य होईल. ही बाब लक्षात घेऊन ही योजना प्रस्तावित केली आहे. त्यासाठी नोंदणी महानिरीक्षक आणि पालकमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच बैठक घेण्यात येणार आहे."
1 comment:

Vijay Sharma said...

easement right of way road access have blcoked of my plot 09860569001.vijay k sharma.

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)