Wednesday, September 28, 2016

शेतकऱ्यांनो सावधान... दोन दशकपूर्ती




माझं शेतकऱ्यांनो सावधान हे पुस्तक १९९६ साली डॉ बुधाजीराव मुळीक सर यांनी प्रसिध्द केले . त्यास आता २० वर्षे पूर्ण झाली. त्या पुस्तकामुळे मला लिहिण्याची सवय तर लागलीच पण एक शेतकरी जेव्हा साताऱ्याहून दुसऱ्यांदा हे पुस्तक घेण्यासाठी आला त्याने मला त्याचे महत्त्व लक्षात आणून दिले. तो बस मध्ये पुस्तक वाचत बसला असताना शेजारच्या माणसाने त्याच्या कडून हे पुस्तक वाचायला म्हणुन घेतले आणि दुप्पट किंमतीला त्याने ते पुस्तक त्याच्या कडून खरेदी घेतो ,तुम्हाला काय ते परत मिळेल असे सांगितले !!आज त्या पहिल्या पुस्तकाची नवी कोरी ४ थी आवृती प्रसिद्ध झाली .मीं ती माझे सासरे तात्यारामबापू आणि सासु कै .रुक्मिणीबाई यांना अर्पण केले आहे.

Tuesday, September 27, 2016

सांगलीचे वैभव 'ब्रँडींग' द्वारे पोचवणार जगभर...


बनगरवाड़ी येथे जलयुक्त शिवार अभियान!


व्यंकटेश माडगुळकर यांनी अजरामर केलेल्या बनगरवाड़ी म्हणजेच लेंगरेवाडीची आजही अवस्था तशीच आहे...महादुष्काळ !

गेल्या 2 महिन्यात आम्ही जलयुक्त शिवार अभियानातून सर्व 3 ओढ्यांचे खोलिकरण व् रुन्दीकरण करुन 1 लाख घन मीटर एवढी पाणी साठवण क्षमता निर्माण केली. काम संपले आणि रात्री पावसाला सुरवात झाली.24 तासात आज सकाळी हे चित्र निर्माण झाले आहे.कदाचीत् कित्येक शतकात असे झाले नसावे !!











Monday, July 4, 2016

अग्रणी नदीचे पुनर्जीवन...

मानदेशात वाहणा-या व एकेकाळी लुप्तल झालेल्यां अग्रणी नदीचे सांगली जिल्हयातील 55 कि.मी. चे काम आता अंतिम टप्प्या त आले आहे. शिवाय अग्रणीवर 27 नविन सिमेंट नाला बांध बांधण्याास सुरवात होत आहे. महाराष्ट्राहतील अग्रणी आता प्रवाही होत आहे. 

कर्नाटकातील खिळेगाव, ता.अथणी, जि.बेळगाव येथे आज मॅगेसेसे अॅवार्ड विजेते डॉ. राजेंद्र सिंह राणा व जिल्हा्धिकारी सांगली यांचे हस्तेा अग्रणी नदीच्या कर्नाटकातील पुनर्जीवन कामाची सुरवात झाली आहे. सांगली जिल्हायात झालेल्याल अग्रणी पुनर्जीवनाच्याी ऐतिहासीक कामापासून स्पुार्ती घेवून स्व.तःहून कर्नाटकातील शेकडो शेतक-यांनी स्वटयंम स्फुलर्ती ने हे काम हाती घेतले आहे. यामुळे 95 कि.मी ची अग्रणी नदी कित्येकक दशकानंतर पुन्हाअ प्रवाही होणेस मदत होणार आहे. कर्नाटकातील शेतक-यांनी या कामासाठी सांगली जिल्हासप्रशासनाबद्दल कृतज्ञता व्य क्तय केली आहे.









Wednesday, June 8, 2016

सांगली ब्रॅन्डिंग...विरगळ.


ग दि मा यांच्या आटपाडी तालुक्यातील माडगुळे गावी गेलो आणि त्यांच्या घरा समोर असे बोर्ड लावले. सांगली ब्रॅन्डिंग चा हा एक भाग आहे.सांगली जिल्ह्यातील मोठ्या व कर्तुत्ववान लोंकांच्या घरासमोर असे 300 बोर्ड किंवा रोड साइनेज आम्ही लावणार आहोत.

या वास्तूचं भाग्य तर फारच थोर! वास्तू कसली, खरं तर गोठाच! १९४८ च्या जळीतात जळलेल्या वाडय़ाची पुन्हा उभारणी करताना उरल्यासुरल्या सामानातून बांधलेला. आता कौलं, फरशी वगैरे असली तरी एक लहानशी लांबट १५ बाय २५ फुटांची झोपडी आणि तिच्यावर पत्रा टाकलेला. खंडोबाच्या देवळाला सामोरी. इथे ‘गदिमां’ना अप्रतिम कविता सुचली. त्यांना वाटलं, हा वास्तूचा गुण आणि वास्तूला वाटलं, हा अण्णांचा परीसस्पर्श की ज्यामुळे माझं नाव झालं. घरापासून जवळच ‘पाव’ नावाचे नऊ एकराचे शेत. खंडोबाच्या माळाकडे तोंड केलं की उन्हाच्या रखरखाटात पाण्याचा अक्षरश: धावता प्रवाह दिसायचा. या मृगजळाला भुललेले हरणांचे कळप लांडग्यांच्या मुखात अलगद जायचे. अशा या रखरखीत ओसाड माळरानाचं ‘गदिमां’नी हिरवाईत रूपांतर करून निवांत केलं. शेजारी आणखी एक १० एकरांचं शेत घेतलं. दोन्हींकडे विहिरी बांधल्या. बामणाचा पत्रा फुलांप्रमाणेच वेगवेगळ्या माणसांनीही मोहरला. जेवणाचा खास गावरान बेत! मळ्यातल्या वांग्याचं भरीत, मीर्चीचा ठेचा, सायीचं दही, कधी पुरणपोळ्यांचा बेत, तर कधी हुर्डा पार्टी. कधी खोडकर मुलाप्रमाणे विहिरीत मुटका मारणं, तर कधी कुस्ती खेळणं. विद्या वहिनींना पोहायला शिकवायच्या निमित्ताने विहिरीत ढकलून देऊन गटांगळ्या खायला लावायच्या (त्यांची पुरेशी काळजी घेतलेली असे) आणि घाबरवायचं आणि त्यांना पोहायला यायला लागल्यावर ‘भोपळ्याला तरंगायला काय खटपट करावी लागते होय?’ असं म्हणून चेष्टा करायची. समोरच्या दगडावर बसून स्नान करायचं, दुपारी जेवल्यावर झाडाखाली जमिनीवरच आडवं व्हायचं. कधी आत व्यवस्थित बैठक घालून उतरत्या डेस्कवर लिहीत बसायचं. गावातल्या व्हरल, रामोशी, धनगर यांना त्यांच्याबद्दल खूप जिव्हाळा! ‘आन्ना लिवत्यात’ असं म्हणून कोणी त्यांची लेखनसमाधी मोडू नये याची ते काळजी घेत. ‘आपला अन्ना’ काहीतरी थोर करतोय, ही त्यांना पक्की जाणीव. प्रत्येकाला वाटे, आपलं हुन्नर ‘अन्ना’ला दाखवावं. काही लोक मस्त कथा-अनुभव सांगत, कोणी क्लॅरोनेटवर गाणं वाजवी, कोणी पारंपरिक वा स्वरचित लावण्या गात, डवरी, मंजिरी वाजविणारा, नाचणारा वासुदेव, गोंधळी आपली कला दाखवीत. असा हा जनलोक आपणहून येई. ‘अन्ना ऐकतूया’ याचंच त्याला मोठं अप्रुप. अण्णापण ही मोठी समृद्धी जाणत होते. त्यांनी उराशी घेतलं की, यांना भरून यायचं. आवडायचं, पण बिचकायचंही, ‘जी, उगाच विटाल व्हईल.’ मग अण्णा शेजारी बसवून घेऊन म्हणत, ‘आरे, कलावंताला जात नसतीय. महा ब्राह्मण असतोय त्यो.’ बामणाचा पत्रा ही मनोमन समाधानानं डवरून जात होता, ही वेगवेगळी श्रीमंत माणसं बघून, त्यांची कला बघून. ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’ या कथांचे स्फूर्तीस्थान. ती अक्षरं कागदावर उमटताना बघून ‘बामणाचा पत्रा’ धन्य व्हायचा! ‘गदिमा’ वर्षांतून १५ दिवस वडिलांच्या श्राद्धतिथीनिमित्त यायचेच तेव्हा ‘बामणाचा पत्रा’ आणि परिसर बहरून जायचा.


या घराच्या भिंतीपाठीमागे एक उभा चिरा बसवला होता. घराण्यातल्या पराक्रमी पुरुषाचे स्मारक! त्याला ‘विरगळ’ म्हणतात, पण आज ‘गदिमा’, ‘व्यंकटेश’ यांच्या रूपाने दोन नवे ‘विरगळ’ उभे राहिले आहेत. ते फक्त त्यांच्या घराण्यातल्या लोकांचेच नव्हे तर समस्त मराठी रसिकजनांचे श्रद्धास्थान बनले आहेत.

JALDOOT Express...!



Monday, May 23, 2016

सह्याद्री वाहिनीवर पहा मिरज ते लातूर रेल्वे जलवाहतुक या प्रयोगाचे चित्रण...


मिरज ते लातूर रेल्वे जलवाहतुक या प्रयोगाचे चित्रण मंगळवारी दिनांक २४ रोजी सायं ७.१५ वाजता सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल.



Monday, April 25, 2016

Online Availability of My Books...

My all books including revised edition of Quasi Judicial functioning of Revenue Officers and Land Issues In India are now available on online sites bigbookshop.com and amazon.com


Links -

http://www.bigbookshop.com/s…/Shekhar-Gaikwad/filter-authors
http://www.amazon.in/s/ref=nb_sb_noss_1…

Wednesday, April 20, 2016

Water Supply to Latur...

Friends,with alternate arrangement for filling tankers ready,we are trying to send full train with 50 tankers worth 25 lakh liters to latur today.





Friday, January 29, 2016

पुस्तक प्रकाशन : Land Issues in India

आज, दिनांक २९.०१.२०१५ रोजी मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते माझ्या Land Issues in India या पुस्तकाचे प्रकाशन मा.महसुलमंत्री, मुख्य सचिव, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पर पडले!!!


माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)