Wednesday, September 28, 2016

शेतकऱ्यांनो सावधान... दोन दशकपूर्ती




माझं शेतकऱ्यांनो सावधान हे पुस्तक १९९६ साली डॉ बुधाजीराव मुळीक सर यांनी प्रसिध्द केले . त्यास आता २० वर्षे पूर्ण झाली. त्या पुस्तकामुळे मला लिहिण्याची सवय तर लागलीच पण एक शेतकरी जेव्हा साताऱ्याहून दुसऱ्यांदा हे पुस्तक घेण्यासाठी आला त्याने मला त्याचे महत्त्व लक्षात आणून दिले. तो बस मध्ये पुस्तक वाचत बसला असताना शेजारच्या माणसाने त्याच्या कडून हे पुस्तक वाचायला म्हणुन घेतले आणि दुप्पट किंमतीला त्याने ते पुस्तक त्याच्या कडून खरेदी घेतो ,तुम्हाला काय ते परत मिळेल असे सांगितले !!आज त्या पहिल्या पुस्तकाची नवी कोरी ४ थी आवृती प्रसिद्ध झाली .मीं ती माझे सासरे तात्यारामबापू आणि सासु कै .रुक्मिणीबाई यांना अर्पण केले आहे.

Tuesday, September 27, 2016

सांगलीचे वैभव 'ब्रँडींग' द्वारे पोचवणार जगभर...


बनगरवाड़ी येथे जलयुक्त शिवार अभियान!


व्यंकटेश माडगुळकर यांनी अजरामर केलेल्या बनगरवाड़ी म्हणजेच लेंगरेवाडीची आजही अवस्था तशीच आहे...महादुष्काळ !

गेल्या 2 महिन्यात आम्ही जलयुक्त शिवार अभियानातून सर्व 3 ओढ्यांचे खोलिकरण व् रुन्दीकरण करुन 1 लाख घन मीटर एवढी पाणी साठवण क्षमता निर्माण केली. काम संपले आणि रात्री पावसाला सुरवात झाली.24 तासात आज सकाळी हे चित्र निर्माण झाले आहे.कदाचीत् कित्येक शतकात असे झाले नसावे !!











नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)