Tuesday, September 19, 2017

भूजल गाथा : भूजल सर्वेक्षण यंत्रनेची उदबोदक फ़िल्म!

भूजल सर्वेक्षण यंत्रनेने जमीनी खालील पाणी व महाराष्ट्राची भौगोलिक रचना या संबधी काही उदबोदक फ़िल्म बनवल्या आहेत.

भुजलाबद्दल संवेदनशील असणाऱ्या सर्वाना त्या अतिशय भावतील. www.gsda.maharashtra.gov.in या संकेतस्थलावर त्या पाहता येतील. त्या पैकी सर्वात प्रभावी ही फ़िल्म!!बनगरवाडी पाऊस...

मागे एकदा ग दि मा यांच्या माडगुळे या गावी त्यांच्या नावाचे बोर्ड लावल्याचे पोस्ट केले होते. त्या आणि आजुबाजुच्या गावामधे जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून प्रचंड काम झाले.

एके काळी बनगरवाडी येथील दुष्काळ अनुभवलेल्या या लोकांना काल झालेल्या पावसाने पहिल्यांदा समुद्रासारखे पाणी पहायला आणि अनुभवायला मिळाले !!


Saturday, September 9, 2017

महान कृषिशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांची भेट

काल पुणे कृषि महाविद्यालयात महान कृषिशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना ऐकण्याची दुर्मिळ संधी मिळाली.

९२ वर्षीय डॉ स्वामीनाथन हे पूर्ण हयात संशोधनात घालवलेले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. विद्यार्थ्यांना तर पुन्हा अशी व्यक्ति पहायला तरी मिळेल का? असा प्रश्न मनात येवून गेला. नोबेल पारितोषिक मिळालेल्या    डॉ. बोरलॉग यांच्यासह त्यांनी हरित क्रांतीसाठी गव्हाच्या बुटक्या व जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती शोधल्या. या वयात शेतकऱ्यांच्या प्रगतीची चिंता वाहणारा हा माणूस हजारो विद्यार्थ्यांना स्फूर्ति देत आहे!!नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)