Saturday, October 6, 2018

मसुरी प्रशिक्षणादरम्यान लडाख मधील सोनम वांगचुक यांची भेट...


आमिर खानचा 3 Idiot हा चित्रपट सर्वांनी पाहीला. लडाख मधील अतिशय दुर्गम भागात सोनम वांगचुक यांनी अशा प्रकारची नाविन्यपूर्ण शाळा गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रयत्नानंतर उभी केली आहे.

मसूरी तील प्रशिक्षणामध्ये अशा नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या भारतातील किंवा परदेशातील महत्त्वाच्या व्यक्तींना समोर आणून त्यापासून काय शिकता येईल याचे धडे दिले जातात .काल वांगचुक आमच्या बरोबर होते त्यांनी त्यांच्या प्रयोगाबद्दल सांगताना खालील दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.

लडाखमध्ये १९९५ पर्यंत एस एस सी बोर्डाचा निकाल पाच टक्के एवढा होता. याचे मुख्य कारण म्हणजे आमची भाषा नसलेल्या उर्दू माध्यमातून आम्हाला शिकवले जात होते आणि पहिलीपासून असलेल्या कोणत्याही पुस्तकातील अनेक शब्दांचा अर्थ आमच्या मुलांना समजत नव्हता. उदाहरणार्थ एस म्हणजे शिप म्हणजे जहाज याचा अर्थ लडाख मध्ये राहणाऱ्या मुलांना  कळण्यापलीकडे होता. एफ म्हणजे  फॅन  असं मुलं घोकंपट्टी करत असले तरी घरी गेल्यावर फॅन म्हणजे काय असं विचारत. ज्या ठिकाणी ऊणे ३५ अंश एवढे थंड हवामान आहे त्या मुलांना त्यांचा उपयोग काय आहे आणि फॅन कसा दिसतो हे समजत नव्हते त्यामुळे संपूर्ण भारतातील पुस्तके त्या त्या भागातील प्रतिके  वापरून नव्याने लिहिली पाहिजेत असे त्यांचे स्पष्ट मत आहे किंबहुना प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सरकारी शाळा सगळीकडे असाव्यात आणि खाजगी शाळा अजिबात असू नयेत असे त्यांचे मत आहे. जगातील सर्वात चांगले शिक्षण फिनलँड देशांमध्ये आहे असे मानतात आणि या फिनलँडमध्ये सरकारी शाळेत प्रवेश मिळाला नाही तरच मुले खाजगी शाळांमध्ये जातात एवढा सरकारी शाळांचा दर्जा चांगला आहे!!

Tuesday, August 21, 2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) नियम २०१८'




मुंबई.दि.२०: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात 'महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) नियम २०१८' या विषयावर भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड व उपसंचालक डॉ. विजय पाखमोडे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दिनांक २१ ऑगस्ट २०१८ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 'महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) नियम २०१८' आवश्यकता व पार्श्वभूमी, भूजलाची पातळी कमी होण्याचे व वारंवार दुष्काळ होण्याचे कारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग,भूजल नियमाबाबतच्या हरकती व सूचनाबाबत सविस्तर माहिती, नव्या नियमानुसार पाण्याची तरतूद, प्रत्येक विहिर मालकास आपल्या विहिरीची नोंदणी करणे बंधनकारक तसेच भूजल नियमाचे दूरगामी परिणाम याबाबतची माहिती श्री.गायकवाड आणि डॉ.पाखमोडे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
 ‍

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लीक करा :




                                                     

Thursday, August 16, 2018

दिलखुलास' कार्यक्रमात संचालक शेखर गायकवाड आणि डॉ.विजय पाखमोडे



मुंबई.दि.१६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात ‘महाराष्ट्र भूजल नियम २०१८’ या विषयावर संचालक शेखर गायकवाड व उपसंचालक डॉ. विजय पाखमोडे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार दि. १७ आणि शनिवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र भूजल नियम २०१८ , भूजल नियमनाची आवश्यकता व पार्श्वभूमी, भूजलाची पातळी कमी होण्याचे व वारंवार दुष्काळ होण्याचे कारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूजल नियमाबाबतच्या हरकती व सूचना, नव्या नियमानुसार पाण्याची तरतूद, शेतकऱ्यांच्या विहिरींची नोंदणी तसेच भूजल नियमाचे दूरगामी परिणाम याबाबतची माहिती श्री.गायकवाड आणि श्री.पाखमोडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)