Tuesday, August 21, 2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) नियम २०१८'
मुंबई.दि.२०: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात 'महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) नियम २०१८' या विषयावर भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड व उपसंचालक डॉ. विजय पाखमोडे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दिनांक २१ ऑगस्ट २०१८ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 'महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) नियम २०१८' आवश्यकता व पार्श्वभूमी, भूजलाची पातळी कमी होण्याचे व वारंवार दुष्काळ होण्याचे कारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग,भूजल नियमाबाबतच्या हरकती व सूचनाबाबत सविस्तर माहिती, नव्या नियमानुसार पाण्याची तरतूद, प्रत्येक विहिर मालकास आपल्या विहिरीची नोंदणी करणे बंधनकारक तसेच भूजल नियमाचे दूरगामी परिणाम याबाबतची माहिती श्री.गायकवाड आणि डॉ.पाखमोडे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
 ‍

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लीक करा :
                                                     

Thursday, August 16, 2018

दिलखुलास' कार्यक्रमात संचालक शेखर गायकवाड आणि डॉ.विजय पाखमोडेमुंबई.दि.१६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात ‘महाराष्ट्र भूजल नियम २०१८’ या विषयावर संचालक शेखर गायकवाड व उपसंचालक डॉ. विजय पाखमोडे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार दि. १७ आणि शनिवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र भूजल नियम २०१८ , भूजल नियमनाची आवश्यकता व पार्श्वभूमी, भूजलाची पातळी कमी होण्याचे व वारंवार दुष्काळ होण्याचे कारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूजल नियमाबाबतच्या हरकती व सूचना, नव्या नियमानुसार पाण्याची तरतूद, शेतकऱ्यांच्या विहिरींची नोंदणी तसेच भूजल नियमाचे दूरगामी परिणाम याबाबतची माहिती श्री.गायकवाड आणि श्री.पाखमोडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)