Saturday, October 6, 2018

मसुरी प्रशिक्षणादरम्यान लडाख मधील सोनम वांगचुक यांची भेट...


आमिर खानचा 3 Idiot हा चित्रपट सर्वांनी पाहीला. लडाख मधील अतिशय दुर्गम भागात सोनम वांगचुक यांनी अशा प्रकारची नाविन्यपूर्ण शाळा गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रयत्नानंतर उभी केली आहे.

मसूरी तील प्रशिक्षणामध्ये अशा नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या भारतातील किंवा परदेशातील महत्त्वाच्या व्यक्तींना समोर आणून त्यापासून काय शिकता येईल याचे धडे दिले जातात .काल वांगचुक आमच्या बरोबर होते त्यांनी त्यांच्या प्रयोगाबद्दल सांगताना खालील दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.

लडाखमध्ये १९९५ पर्यंत एस एस सी बोर्डाचा निकाल पाच टक्के एवढा होता. याचे मुख्य कारण म्हणजे आमची भाषा नसलेल्या उर्दू माध्यमातून आम्हाला शिकवले जात होते आणि पहिलीपासून असलेल्या कोणत्याही पुस्तकातील अनेक शब्दांचा अर्थ आमच्या मुलांना समजत नव्हता. उदाहरणार्थ एस म्हणजे शिप म्हणजे जहाज याचा अर्थ लडाख मध्ये राहणाऱ्या मुलांना  कळण्यापलीकडे होता. एफ म्हणजे  फॅन  असं मुलं घोकंपट्टी करत असले तरी घरी गेल्यावर फॅन म्हणजे काय असं विचारत. ज्या ठिकाणी ऊणे ३५ अंश एवढे थंड हवामान आहे त्या मुलांना त्यांचा उपयोग काय आहे आणि फॅन कसा दिसतो हे समजत नव्हते त्यामुळे संपूर्ण भारतातील पुस्तके त्या त्या भागातील प्रतिके  वापरून नव्याने लिहिली पाहिजेत असे त्यांचे स्पष्ट मत आहे किंबहुना प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सरकारी शाळा सगळीकडे असाव्यात आणि खाजगी शाळा अजिबात असू नयेत असे त्यांचे मत आहे. जगातील सर्वात चांगले शिक्षण फिनलँड देशांमध्ये आहे असे मानतात आणि या फिनलँडमध्ये सरकारी शाळेत प्रवेश मिळाला नाही तरच मुले खाजगी शाळांमध्ये जातात एवढा सरकारी शाळांचा दर्जा चांगला आहे!!

माझी प्रकाशित पुस्तके

१. शेतक-यांनो...जमिनी सांभाळा!

२. कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा

३. Home Delivery Scheme of Foodgrains

४. घरपोच धान्य योजना

५. महसूल अधिका-यांचे अर्धन्यायिक कामकाज

६. शेतीचे कायदे

७. फेरफार नोंदी

८. शेतक-यांनो सावधान

९. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति


नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)