Showing posts with label Response. Show all posts
Showing posts with label Response. Show all posts

Saturday, August 5, 2017

ब्लॉगची भेटसंख्या १०००००+


Shekhar Gaikwad, IAS || शेखर गायकवाड, भाप्रसे









सन २००८ मध्ये हा ब्लॉग सुरु करण्यात आला व आजमितीस या ब्लॉगची भेटसंख्या १०००००+ इतकी झाली आहे. त्याबद्दल सर्व ब्लॉग वाचकांचे अभिनंदन आणि आभार!!!

ब्लॉगवरील तुमचे प्रेम, लोभ असाच कायम रहावा, किंबहुना तो उत्तरोत्तर वाढतच जावा ही अपेक्षा…

शेखर गायकवाड, भाप्रसे

Monday, May 23, 2016

सह्याद्री वाहिनीवर पहा मिरज ते लातूर रेल्वे जलवाहतुक या प्रयोगाचे चित्रण...


मिरज ते लातूर रेल्वे जलवाहतुक या प्रयोगाचे चित्रण मंगळवारी दिनांक २४ रोजी सायं ७.१५ वाजता सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल.



Thursday, January 17, 2013

चौथे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन...

दिनांक ११ ते १३ जानेवारी २०१३ रोजी नाशिक येथे श्री शेखर गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली चौथे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पार पडले. त्यासंबंधी प्रकाशित वृत्त व छायाचित्रे :

सकाळ - स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आजपासून

लोकसत्ता - स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनास आज ग्रंथदिंडीने प्रारंभ

लोकमत - आजपासून स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन

देशदूत - महाराष्ट्रातून प्रशासकीय अधिकारी घडावे : भुजबळ

ऍ़ग्रोवन - नाशिकला स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनास प्रारंभ

महाराष्ट्र टाईम्स - स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे

दिव्यमराठी - स्पर्धा परीभा साहित्य संमेलन : ग्रामीण भागात सेवेची खरी संधी




Thursday, January 10, 2013

दै. सकाळ मधील प्रकाशित मुलाखत...

महाराष्ट्रीय विद्यार्थी देशात सर्वप्रथम यावा!
सिद्धेश्‍वर डुकरे, मुंबई




महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीत प्रवेश करावा, हे विद्यार्थी राजपत्रित अधिकारी म्हणून अथवा केंद्रीय स्तरावर अखिल भारतीय सेवेत यशस्वी व्हावेत, यासाठी त्याला पूरक वातावरण मिळावे, त्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षांबाबत जाणीव आणि जागृती निर्माण व्हावी, यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये लोकाभिमुख प्रशासन करण्याची अंगभूत जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने गेली तीन वर्षे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यंदा नाशिक येथे 11, 12 आणि 13 जानेवारीस हे संमेलन होत आहे. त्याच्या अध्यक्षस्थानी आहेत मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव शेखर गायकवाड. या संमेलनाबद्दल त्यांच्याशी झालेली बातचीत...


अशा प्रकारच्या संमेलनाचा विचार कसा सुचला?

गायकवाड : निरनिराळी संमेलने होत असतात. त्या संमेलनांना लहान मुलांसह पालक आणि ज्येष्ठ मंडळी येत असतात, असे आमचे निरीक्षण आहे; मात्र तरुण वर्ग कोठेही दिसत नव्हता. या वर्गाला कोठेतरी "रिलेट' करायला हवे. त्यांच्याशी त्यांच्या "करिअर' आणि "अँबिशन'विषयी बोलायला हवे. तसेच पैसा, वशिला, वारसा याच्यापलीकडे जाऊन स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाले, तर तुम्ही प्रशासनात सर्वोच्च स्थानी पोचू शकता, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी अशा प्रकारचे संमेलन घेणे आवश्‍यक वाटू लागले. त्यातून या संमेलनाचा जन्म झाला. 

मागील तीन वर्षांचा संमेलने भरविण्याचा अनुभव कसा होता? 

गायकवाड : पहिले संमेलन आम्ही 2010 मध्ये पुण्यात भरवले होते. 65 हजारांवर विद्यार्थ्यांनी संमेलनाला हजेरी लावली. त्यानंतर 2011 मध्ये औरंगाबाद, 2012 मध्ये नागपूर आणि आता नाशिक येथे हे संमेलन होत आहे. प्रत्येक संमेलनाने सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येचा उच्चांक मोडला आहे. यंदाही लाखाच्या वर विद्यार्थी येणे अपेक्षित आहे.


संमेलनामागील आपली भूमिका काय आहे?

गायकवाड : महाराष्ट्रात गुणवत्तेची वानवा नाही. आपले विद्यार्थी सर्व प्रकारच्या परीक्षांत देशात चमकतात; मात्र त्यांना गरज आहे ती योग्य पद्धतीचे वातावरण मिळण्याची. दहावी-बारावीला बोर्डात आलेले विद्यार्थी वीस वर्षांपूर्वी डॉक्‍टर, इंजिनिअर कोर्सला जात असत. नंतर परदेशात जायला लागले. मग आयटी क्षेत्राकडे वळू लागले; मात्र प्रशासकीय सेवेत येण्याचा तरुणांचा ओढा कमी होता... अजूनही कमीच आहे. म्हणूनच ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पूरक वातावरण मिळणे गरजेचे आहे. प्रत्येक परीक्षेच्या स्वरूपाप्रमाणे शिकवण्या, अभ्यासाची पुस्तके मिळणे आवश्‍यक आहे. नव्वदच्या दशकापर्यंत महाराष्ट्रात वातावरण नव्हते. आता खूपच फरक पडला आहे.


स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सरकारी पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत? 

गायकवाड : शासनाने सनदी सेवेचे मार्गदर्शन करणारी केंद्रे उभारली आहेत. मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर येथे ही केंद्रे आहेत. विद्यापीठातही अशा प्रकारची केंद्रे आहेत. पुण्यात "यशदा' आहे. त्याची व्याप्ती अजून वाढवायला हवी, असे वाटते.


एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काय सांगाल?

गायकवाड : स्वातंत्र्यापूर्वी आयसीएस परीक्षेत सी.डी. देशमुख यांनी घवघवीत यश मिळवले होते. आधुनिक महाराष्ट्रातील विद्यार्थी आयएएस परीक्षेत अद्याप सर्वप्रथम आला नाही. तो यावा, ही अपेक्षा आहे.

Monday, October 22, 2012

महान्यूज पोर्टलवर 'सातबारा' सदर...

महाराष्ट्र शासनाने नुकतेच आपल्या विभागांमार्फत होणा-या विविध विकास कामांच्या प्रसिद्धीसाठी 'महान्यूज ' हे पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलवर 'यशकथा', 'योजना', 'अनुभव', 'ई संस्कृती', 'आपली मराठी', 'कडू आणि गोड', 'वाचावे असे काही', 'प्रेरणा' आणि 'सात-बारा' अशी सदरे आहेत.

त्यामधील सात-बारा या सदराखाली आता महाराष्ट्रातील तमाम शेतक-यांना गोष्टीरुप जमिन व्यवहार निती समजेल अशी उदाहरणे वाचता येतील.

महान्यूजवरील सात-बारा सदर पाहण्यासाठी क्लीक करा: http://mahanews.gov.in/Home/MahaNewsHome.aspx

Thursday, May 31, 2012

Centre Proposes 6 Months Advance Allocation of PDS Grains

Finally the central govt accepted the idea of advance one time allocation of foodgrains to beneficiaries on the lines of ONE Time Home Delivery Scheme of Foodgrains scheme, Nashik. I see the move as alternative successful strategy of food distribution mechanism...Shekhar Gaikwad

--------------------------------------------------------------------------------

Press Information Bureau
Government of India
Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution
24-May-2012 16:42 IST


Centre Proposes Six Months Advance Allocation of PDS Grains

In view of existing stock position of food grains in the Central Pool, the Center has decided to permit the states/UTs for lifting and distributing six months quota of food grains in one go, under the Targeted Public Distribution System (TPDS).

In a communication sent to the Chief Ministers of all the States/UTs, Union Minister of Consumer Affairs, Food and Public Distribution, Prof K.V. Thomas has requested the states to avail the facility of advance lifting of food grains and its onward distribution to the TPDS beneficiaries to the maximum extent possible. This will not only ease the problem of additional storage in view of increased procurement but also ensure uninterrupted supply of ration to the beneficiaries.

Prof Thomas has also requested the States to ensure lifting of additional allocation of 60 lakh tons for Above Poverty Line (APL) and 15.40 lakh tons for poorest districts in 12 States made during the current year under TPDS to the States/UTs. He has regretted that the states have lifted only 27 percent of the allocation made to these districts during 2011-12.

Regarding the six months advance allocation of ration to PDS beneficiaries in one go, the States have been advised to ensure that beneficiaries are not compelled to lift their entire allocation in one go and it should be purely voluntary. In order to ensure transparency, states have been advised that the bulk distribution may be made as far as possible in the presence of state government officials, representatives of Panchayati Raj Institutions, members of vigilance committees in Gram Sabhas and NGOs concerned.

Wednesday, January 4, 2012

सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत धान्य हमी योजना राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

The innovative one time Home Delivery Foodgrains Distribution scheme started by me in Nashik District has been recognised and applied throughout the State by State Cabinet today as 'Dhanya Hami Yojana'. Hope the poor would definitely benefit from this alternative mechanism of food distribution... 
 

नाशिक जिल्ह्यात सुरु केलेली घरपोच धान्य योजना यशस्वी अनुभवाच्या आधारे राज्यातील सर्व जिल्ह्यात तसेच मुंबई आणि ठाणे शिधा वाटप क्षेत्रात रेशनिंगवर "धान्य हमी योजना" राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने नुकताच घेतला आहे. या योजनेअंतर्गत एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य गरिबांना सार्वजनिक वितरण प्रणालीत वाटप करण्यात येईल. ही योजना मी दिनांक ६ जून २००७ रोजी नाशिक जिल्ह्यातील अलंगूण, तालुका सुरगणा येथे पहिल्यांदा राबविला आणि आतापर्यंत १० जिल्ह्यातील सुमारे ४००० गावांमध्ये ही योजना लोकांनी स्वत:हून स्विकारली आहे.

याविषयीचे विविध लेख पाहण्यासाठी क्लीक करा :

      Wednesday, August 10, 2011

      ई-मनोगत : घरपोच धान्य योजना

       नमस्कार,

      आपण घरपोच धान्य वाटप योजना सुरु केली आणि गरीबांपर्यंत शासकीय दरात व नियमाप्रमाणे धान्य पोहचत आहे. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. ही योजना जानेवारीमध्ये माझ्या गावात सुरु केली. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात जंगलालगत वसलेलं एक छोटसं मन्याळी नावाचं खेडं. या खेडयात रस्ता, आरोग्य, शिक्षण अशा एक ना अनेक समस्या.

      मी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं, यावेळी महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांच्या 'निर्माण' चळवळीत सामिल झालो व निर्णय घेतला तो माझ्या गावात जाऊन लोकांसाठी काम करण्याचा. लोकांची गरज ओळखून काम सुरु करावं असं ठरवलं. गावात गेलो तेव्हा अन्नधान्याचा तुटवडा होता कारण यावर्षी ज्वारीचं पिक फारच कमी आलं व गहू येण्यासाठी दोन-अडीच महिने अवकाश होता. त्यामुळे अनेकांच्या घरचं धान्य संपलं असं चित्र होतं. यावर उपाय एकच दिसू लागला तो म्हणजे आपली घरपोच धान्य योजना. धान्य ही लोकांची गरज म्हणून मी बचत गटाच्या महिलांच्या मिटींग घेतल्या व तीन महिन्यांचं धान्य उचलण्यासाठी पैसे जमा करण्याची जबाबदारी त्या गटाच्या अध्यक्ष व सचिवावर सोपविली. माझी कामाची सुरुवात असल्यामुळं पैसे जमा करताना अनंत अडचणींना सामोरे जावं लागलं पण लोकाच्या गरजेपोटी हे शक्य झालं. यवतमाळ जिल्ह्यात पहिल्यांदा मन्याळीत ही योजना सुरु करतांना आमदार विजयराव खडसे व तहसिलदार राजेंद्र जाधव यांनीही फार मोलाचं सहकार्य केलं. १२०० लोकांच्या वस्तीत एकावेळी 194 क्विंटल धान्य आलं. चावडीवर पोत्यांची थप्पी लावली तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की सरकार किती धान्य गरिबांना देते. एक छोटेखाणी कार्यक्रम घेतला व आमदार विजयराव खडसे, तहसिलदार राजेंद्र जाधव यांच्या हस्ते वाटप केलं. यापूर्वीची स्थिती अशी होती की अनेकांना हेच माहिती नव्हतं की आपल्याकडे BPL चे राशन कार्ड आहे. कुणाला किती धान्य मिळतं याबाबत गावात कुणाकडेच उत्तरं नव्हती. पण या योजनेमुळे लोकांच्या लक्षात आलं की शासन आपल्याला किती धान्य देतं. एकाच वेळी गावात एवढं धान्य त्यामुळं लोक बोलत होते - "गावात अबादानी झाली. गावाचा पांग फिटला"

      तीन महिन्यांचं धान्य गावात एका वेळी आलं. हे पाहून लोकांनी पुढच्या वेळी सहा महिन्यांचे चलन भरले. म्हणजे मला फार कष्ट घ्यावे लागले नाही. गावात सहा महिन्यांचं धान्य मागवलं व दोन्ही वेळा १००% योजना यशस्वी झाली. पण स्वस्त धान्य दुकानदारास धान्य काळया बाजारात विकता येत नसल्यामुळे त्याने गावक-यांना खूप त्रास दिला.

      माझी विकास कामाची सुरुवात घरपोच धान्य योजनेपासून झाली. गावातल्या प्रत्येकाला या योजनेमुळे थेट फायदा झाला. गावातला प्रत्येकजण माझ्याशी जोडला गेला. याचा उपयोग घेत मी गावात अनेक विकास कामे करु शकलो. यात गावात विहीर, रस्ते अशी पाच लाख रुपयांची श्रमदानातून कामे मी गावक-यांकडून करुन घेतली. ७०% घर टॅक्स वसूली ६०% घरी शौचालय लोकांनी बांधली. धान्याप्रमाणे केरोसिनची शासकीय नियमाप्रमाणे गावक-यांची मागणी केली व लोकांना आता केरोसिन सुद्धा योग्य दरात व प्रमाणात मिळते आहे. गावात श्री अमित डहाणूकर (उद्योगपती) यांच्या मदतीने ग्रीन हाऊस उभारले ज्यामध्ये ३० हजार चिंच, आवळा, बांबू, जांभूळ यांसारख्या वृक्षांची रोपं तयार केली. गावातला होणारा हा सकारात्मक बदल पाहून माझ्या गावाला डॉ. अभय बंग, अमरावती विभागीय आयुक्त प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी श्रावन हर्डीकर आदींनी भेटी देऊन गावक-यांचं कौतुक केलं. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे अवघ्या दहा महिन्यात गावात जो विकास कामांनी वेग घेतला त्याची 'की' म्हणजे घरपोच धान्य वाटप योजना.













      सर, आपल्या घरपोच धान्य वाटप योजनेमुळे लोकांना धान्य तर मिळालंच शिवाय माझ्यासारख्या कार्यकर्त्यास विकास कामाची 'की' दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.


      संतोष रामदास गवळे
      मन्याळी, ता. उमरखेड
      जि. यवतमाळ

      Monday, July 18, 2011

      यशवंत गौरव देवमामलेदार पुरस्‍कार-२०११



      नाशिकपासून अवघ्या ९० किमी अंतरावर असणारे सटाणा (बागलान), येथील यशवंत महाराज मंदीर हे या पंचक्रोशीतील आराध्य दैवत मानले जाते. सन १८६९ साली प्रशासकीय कामकाज अतिशय चोख आणि न्यायाला धरुन कार्य करणा-या सात्विक अशा सटाण्याच्या मामलेदारांनांचा लोक 'देवमामलेदार' म्हणून ओळखू लागले. महाराष्ट्रात सरकारी अधिका-यांचे मंदीर सटाण्याशिवाय अन्य ठिकाणी नाही.

      साईबाबांचे समकालीन असणा-या देवमामलेदारांच्या नावे दिला जाणारा 'यशवंत गौरव देवमामलेदार पुरस्कार  - २०११' मला नुकताच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या हस्ते सटाणा येथे देण्यात आला. शेतक-यांसाठी व सामान्यांसाठी मनापासून काम करण्यासाठी हा पुरस्कार निश्चितपणे मला स्फूर्ती देईल.

      Friday, July 8, 2011

      सातबारा वेबसाईट अभिप्राय

      आदरणीय श्री शेखर सर,

      आपली website सातबारा.को.इन (www.satbara.co.in) हि अतिशय उत्कृष्ट व मार्गदर्शनपर असून खूप आनंद वाटला. आपल्या सारख्या अधिका-यांकडून शेतकरी जनतेला हीच अपेक्षा आहे...

      आपल्या ह्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!!!


      धन्यवाद.

      डॉ. प्रशांत रामदास पाटील 
      नाशिक

      Monday, July 4, 2011

      घरपोच धान्य योजनेस अकोले या आदिवासी तालुक्यातून उत्सफुर्त प्रतिसाद


      अहमदनगर जिल्ह्यात घरपोच धान्य योजना सुरु झाल्यानंतर आदिवासी दुर्गम अशा अकोले तालुक्यातून आदिवासींनी या योजनेचे अतिशय उत्सफूर्त स्वागत केले आहे. 

      या योजनेमध्ये आतापर्यंत ७८ गावांनी सहभाग नोंदवला असून या आदिवासी तालुक्यातील ७०% भाग घरपोच धान्य योजनेखाली पूर्ण झाला आहेएकूण १०,००० कुटुंबांनी १०,००० क्विंटल धान्य घेतले अशी माहिती प्रांताधिकारी संगमनेर श्री जितेंद्र काकुस्ते यांनी दिली.

      यावरुनच गरिबांसाठीच्या या योजनेचे ख-या अर्थाने चीज झाले असे म्हणता येईल...

      Monday, June 20, 2011

      जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (६)

      श्री लक्ष्मण शेलार यांनी विचारलेला प्रश्न :

      Respected Sir,

      I have problem about my farm land. My case is as follows : My grandfather had purchased a farmland in 1952.

      (A) After my grandfather had transferred the same to my father by partition as per, gao namuna no 6 in record of right by jabab,not by registered partition.

      (B) My father had we three sons and three daughters. Now my father had registered gift deed in sub registrar office to only our middle brother.

      I had a question, how my father can do the legal gift and gift for only son? We are member of HUF and coparsener by birth. Ref land is brought my grandfather. how my father do so? 

      Please give me your expert opinion.

      Thanking you.

      Laxman Shelar


      श्री लक्ष्मण शेलार यांचे शंकासमाधान झाल्यानंतरचा ईमेल  : 

      Dear Sir,

      Your reply had received.

      I am very glad with your opinion, with my question had studied by Circle Inspector and in result of Ferfarnond, the Circle has rejected the Ferfarnonde made by Talathi after giving hearing to us. Circle Inspector in his judgement accept the coparcenary right of our all waras of our family and so the Ferfarnond by gift deed is rejected on merit as per your opinion.

      Please give me further direction in my favor.

      Thanking you.

       Laxman Shelar

      Tuesday, May 31, 2011

      जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (५)

      श्री राजीव अधिकारी यांनी विचारलेला प्रश्न :

      Dear Mr. Gaikwad,

      I have visited your website and found it to be very useful. I seek your advice and guidance for some clarifications, how can I get in touch with you so that we can speak. Look forward to your response.

      Warm Regards

      Rajiv Adhikari
      +91 98201 28688


      श्री राजीव अधिकारी यांचे दूरध्वनीवरुन शंकासमाधान झाल्यानंतरचा ईमेल  : 

      Dear Mr. Gaikwad,

      It was a real pleasure talking to you.Your guidance has been immensely valuable. I look forward to staying in touch with you.

      Warm Regards.
      Rajiv Adhikari
      +91 98201 28688

      Monday, April 25, 2011

      सातबाराविषयी ईमेलद्वारे शंकासमाधान (३)

      श्री संजय निकम यांनी विचारलेला प्रश्न :

      Dear Shekhar Saheb,

      I need very desperate help from you.

      I am Sanjay Nikam, residing at Mumbai, I am in process to purchase Agriculture Land at Neral (Karjat). Shekhar saheb, I have Registered the document, paid Stamp Duty, completed formalities like purchaser & seller by taking my photo & seller's photo, sign & thumb impression by producing 7/12 Extract as my farmer certificate.

      After this now circle person (may be from Revenue Department or Tahsildar office) they are asking me for Farmer Certificate even for above formalities I have produces 7/12 Extract. Please do suggest if I need to produce the same or 7/12 Extract will prove as I am armer instead producing Farmer Certificate ?

      Nobody told me that I have to produce this certificate even after completing these formalities. I dont mind going to native place & get Farmers certificate but I dont know how much time it will take and how much money I have to give under the table.

      Can 7/12 Extract be considered as Farmer Certificate to purchase this land? I think agent between this trying to play tricks to get money.

      Kindly suggest who do I do. You can contact me on 9833112332 or give me your contact number.

      Please do reply.

      Thanks &Regards,

      Sanjay

      श्री संजय निकम यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर : 

      Dear Sanjay,

      If you or your father is owing any agricultural land on their name, then 7-12 extract is enough evidence as a agraiculturist.


      श्री संजय निकम यांचे प्रतीउत्तर :

      Dear Shekhar Saheb,

      Thanks for your reply. My father's & my name is there on 7/12 extract but it is not considered. I went to native place & got the Farmer's Certificate from Tahsildar & submitted the same. Thank you very much for your kind guidance.

      My next step will be getting electric connection & water connection to land.

      Thanks & Regards,
      Sanjay

      Sunday, April 24, 2011

      प्रकाशित पुस्तकांवर प्राप्त ईमेल प्रतिक्रिया

      Email from Shri Sanjeev Malhotra :

      Dear Sir,

      Recently I had come across  some books written by you.They were really a very good guidence sort for people holding agricultural lands, basically the poor farmers, who has only the ancestral lands as their livelyhood.Sir somehing should be done so that their lands are not grabbed by the landsharks under the pretext of development.



      Reply to Shri Sanjiv Malhotra

      Dear Sanjeevji,
      Yes, Its true.
      Thats exactly the spirit which drives me to write.
      Thanks for the encouraging words.

      जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (३)

      श्री. राजू फंडे यांनी विचारलेला प्रश्न :

      नमस्कार

      आपली वेबसाईट पाहिली. जमिनीची माहिती खूप सोप्या पद्धतीने मांडली आहे.

      मला अशी माहिती हवी आहे की, सन १९६८ च्या आसपास आमच्या आजोबांनी त्यांच्या मित्राला ५ रुपयांच्या स्टँप पेपरवर २० एकर जमीन मेहनत करुन खायला दिली होती. आता सातबारा त्यांच्या नावावर येतो. ती जमीन आम्हाला पुन्हा मिळू शकते का? त्यासाठी काय करावे लागेल? कृपया माहिती द्या.

      आपला

      राजू फंडे

      श्री राजू फंडे यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर : 

      राजेशजी,
      तुम्ही १९६७ पासूनचे सर्व सातबारा व फेरफार नोंदी स्कॅन करुन मला मेल करा.

      Tuesday, April 12, 2011

      जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (२)

      श्री. रामचंद्र मोरे यांनी विचारलेला प्रश्न :

      नमस्कार

      मला माझ्या जमिनीची वाटणी करायची आहे. वडील मरण पावले असून आई, मी, बहिण व भाऊ असे चार वारसदार आहेत. आईचा वेगळा हिस्सा काढतात का?

      आपला
      रामचंद्र मोरे

      श्री रामचंद्र मोरे यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर : 

      रामचंद्रजी, 

      आई व बहिण यांचा एक हिस्सा होणार. आईच्या मृत्यूनंतर मुले व मुली यांना हिस्सा मिळणार. कृपया www.satbara.co.in या वेबसाईट वरील वाटप हे प्रकरण वाचा.

      माझी प्रकाशित पुस्तके


      १ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

      २ . फेरफार नोंदी (१९९९ )

      ३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


      १८. भूजल स्मरणिका (२०२०)

      १९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

      . ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

      २१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

      २२. Beyond Competition(२०२०)

      २३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

      २४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

      २५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

      २६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

      २७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

      २८. मुलाखतीचे पैलू (२०२३)

      २९. प्रशासकीय योगायोग (२०२४)

      ३०. महसुली शब्दकोश (२०२४)

      ३१. हक्कसोडपत्र बक्षिसपत्र मृत्युपत्र (२०२४)

      ३२. रंगमहसूली (२०२४)

      ३३. मराठी रंगभूमीवरील दोन अंकी नाटक...राजकारणातले राजकारण (२०२४)

      ३४. Scrutiny and Nominations Loksabha & Assembly Elections (२०२४)

      ३५. सरकारी ऋतुचक्र (२०२४)

      ३६. Land Laws (२०२५)

      ३७. Law Graduates (२०२५)

      ३८. माणूस आणि प्रॉपर्टी (२०२५)

      ३९. यशदाची यशोगाथा (२०२५)