Friday, November 16, 2012

शेखर गायकवाड लिखित - 'प्रशासनाच्या नव्या वाटा' प्रकाशनाच्या वाटेवर...

शालेय जीवनात उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असणारे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येऊन देखील, प्रशासकीय व्यवस्था त्याप्रमाणात जर सुधारणार नसेल तर त्यासाठी निश्चितच काही अतिरिक्त क्षमता व कौशल्य प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही. 

शासकीय नोकरीच्या चौकटीत आपण काही नवनिर्मिती करु शकतो असा विश्वास अपवादानेच दिसून येतो. काही थोडया अधिका-यांमध्ये असा उत्साह नोकरीच्या सुरुवातीला दिसतो. घर, कार्यालय, संसार, इतर जबाबदा-यांशी तडजोड करता-करता पुढे-पुढे तो कमी होत जातो.

उपजत कल्पनाशक्तिचा विसर पडू नये म्हणून शासन सेवेत असलेल्या व नव्याने दाखल होणा-या अधिका-यांसाठी काही निवडक नाविन्यपूर्ण प्रयोग शेखर गायकवाड लिखित 'प्रशासनाच्या नव्या वाटा' या पुस्तकाच्या माध्यमातून लवकरच प्रकाशित होत आहेत.

No comments:

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)