
नाशिकपासून अवघ्या ९० किमी अंतरावर असणारे सटाणा (बागलान), येथील यशवंत महाराज मंदीर हे या पंचक्रोशीतील आराध्य दैवत मानले जाते. सन १८६९ साली प्रशासकीय कामकाज अतिशय चोख आणि न्यायाला धरुन कार्य करणा-या सात्विक अशा सटाण्याच्या मामलेदारांनांचा लोक 'देवमामलेदार' म्हणून ओळखू लागले. महाराष्ट्रात सरकारी अधिका-यांचे मंदीर सटाण्याशिवाय अन्य ठिकाणी नाही.