Wednesday, January 22, 2020

आयुक्त, पुणे महानगपालिका कार्यभार स्विकारताना....



श्री शेखर गायकवाड, भाप्रसे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणून दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी पदभार स्विकारला.


Tuesday, January 21, 2020

ऊस पुरवठादार शेतकरी, कारखानदार, सर्वसामान्य नागरिक यांचेकरीता उपयुक्त माहितीपुस्तिका : एफ. आर. पी.


============================================

ऊसाच्या दरासंबंधी नेहमी वापरला जाणारा शब्द म्हणजे एफ. आर. पी.          

            ...................या एफ. आर. पी. चा अर्थ काय? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो.

============================================

साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस पुरविणारे उत्पादक शेतकरी, पुरवठादार यांना त्यांनी पुरवठा केलेल्या ऊसापोटी साखर कारखान्यांनी द्यावयाची कायदेशीर किमान किंमत म्हणजेच Fair and Remunerative Price / एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर).

महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व सर्वांगिण ग्रामीण प्रगतीमध्ये साखर कारखानदारी व ऊस पुरवठादार यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे. सर्वसाधारणपणे राज्यात दरवर्षी रुपये २१ ते २४ हजार कोटी इतकी एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) महाराष्ट्रातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना कारखान्याकडून दिली जाते. या उदयोगातील शेतकऱ्यांची संख्या साधाणत: ३० लाख असून सभासद संख्या २० लाख इतकी आहे. एफ. आर. पी. ची रक्कम कारखान्याने वेळेवरती देण्यासाठी साखर आयुक्तालयास समन्वय, कायदेशीर उपाय व सनियंत्रण करावे लागते. राज्यातील ऊस पुरवठादारांना त्यांच्या तक्रारींची दाद कोठे व कशी मागावी याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे.


याकरीता ऊस पुरवठादार शेतकरी, कारखानदार, सर्वसामान्य नागरिक यांना उपयुक्त अशी एफ. आर. पी. माहितीपुस्तिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये एफ. आर. पी. म्हणजे काय, त्यातील कायदेशीर तरतूदी, महसूली विभागणी सुत्रानुसार दर (RSF) म्हणजे काय? यासंदर्भात शेतकऱ्यांनी लक्षात ठेवण्यासारख्या बाबी तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे पत्ते व संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.




माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)

२९. महसुली शब्दकोश (२०२४)

३०. हक्कसोडपत्र बक्षिसपत्र मृत्युपत्र (२०२४)

३१. रंगमहसूली (२०२४)

३२. मराठी रंगभूमीवरील दोन अंकी नाटक...राजकारणातले राजकारण (२०२४)

३३. Scrutiny and Nominations Loksabha & Assembly Elections (२०२४)