Tuesday, April 12, 2011

सातबाराविषयी ईमेलद्वारे शंकासमाधान (२)

श्री महेश पाटील यांनी विचारलेला प्रश्न :

मला इंटरनेटवर सातबारा कसा पहायचा हे माहित आहे, पण नेटवर  मला गाव गट पुस्तक नकाशा सर्व्हे नंबरवाईज कसा बघायचा तो माहित नाही. त्यासाठी कोणती वेबसाईट वापरायची ते कृपया सांगावे.


आपला
महेश पाटील


श्री महेश पाटील यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर : 

महेशजी, ही माहिती नेटवर कोठेही उपलब्ध नाही. या माहितीचे संगणकीकरण (Computerisation)  झालेले नाही.

सातबाराविषयी ईमेलद्वारे शंकासमाधान (१)

श्री मारुती कदम यांनी विचारलेला प्रश्न :

आदरणीय सर,

माझ्या सातबारावर माझ्या बहिणीचे नाव आहे. परंतु, बहिणीचा मृत्यू होऊन ५ वर्षे झाली आहेत. तर तीचे नाव कमी करायचे आहे. नाव कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे?

आपला

मारुती कदम
सोनसल, काडेगाव, सांगली
०८८२८५६५०५२

श्री मारुती कदम यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर : 

मारुती, बहिणीला किती मुले-मुली आहेत? त्यांची नावे वारस म्हणून प्रथम सातबारावर लावावी लागतील. नंतर त्यांनी जमिनीतील हक्क सोडावा लागेल, तरच हे होईल.

जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (१)

श्री. रामचंद्र जयराम मोरे यांनी विचारलेला प्रश्न :

श्री. गायकवाड साहेब यांस,
वि.वि,

आपली माहिती ईंटरनेटवर वाचली. माझी करमर तालुका, जिल्हा रायगड येथे जमीन आहे. मला जागेची समान वाटणी करावयाची आहे. बहिण ह्क्क सोड्ण्यास तयार आहे. मोजणी करावयाची होती प्ररंतु घनदाट जंगल असल्यामुळे आतापर्यंत कोणी मोजमापणी केली नाही. मी ओळखीचा सरकारी भाउसाहेब मोजमापनिसाठी आणला होता प्ररंतु  त्यानी व्यवस्थीत केली नाही. नकाशे अपुरे होते. 
आता मी पूर्ण नकाशे आणले आहेत. नकाशा प्रमाणे जमीन वाटत नाही. थोडाफार फरक जाणवतोय काय करावे?.चलते यानी दाखवील्या प्रमाणे जमीनीच्या शिव येथे चुना मारला आहे जमीन सरळ असल्यामुळे चार नंबर मिळून चौरस जमीन होते  चौरस भागाच्या मधोमध सरळ रेषा मारुन दोन भाग करुन एक भाग भावाच्या नावे व एक भाग माझ्या नावे करता येईल का ?

आपला
रामचंद्र जयराम मोरे
करमर तालुका, जिल्हा रायगड
9867075133

श्री रामचंद्र मोरे यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर : 

मोजणी न करता लांबी व रुंदी यांचा आधार घेऊन समान वाटप करा. वाटपात मात्र सारखे क्षेत्र नमूद करा.

माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. मुलाखतीचे पैलू (२०२३)

२९. प्रशासकीय योगायोग (२०२४)

३०. महसुली शब्दकोश (२०२४)

३१. हक्कसोडपत्र बक्षिसपत्र मृत्युपत्र (२०२४)

३२. रंगमहसूली (२०२४)

३३. मराठी रंगभूमीवरील दोन अंकी नाटक...राजकारणातले राजकारण (२०२४)

३४. Scrutiny and Nominations Loksabha & Assembly Elections (२०२४)

३५. सरकारी ऋतुचक्र (२०२४)

३६. Land Laws (२०२५)

३७. Law Graduates (२०२५)

३८. माणूस आणि प्रॉपर्टी (२०२५)

३९. यशदाची यशोगाथा (२०२५)