इंटरनेटसारख्या प्रभावी माध्यमाद्वारे शेतकरी, महसूल अधिकारी आणि जमिन व कायदेविषयक जिज्ञासा असणा-या सर्वांसाठी आवश्यक त्या माहितीचे दालन खुले करुन देणे या उद्देशाने हा ब्लॉग सुरु करण्यात आला आहे.
'जमिनींचे वाद' व 'महसूल कर्मचा-यांचे प्रशिक्षण' या दोन विषयांवर सादरीकरणाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे :
१) जमिनविषयक वादांची मिमांसा :
अद्ययावत माहितीच्या शिक्षणाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारतातच; परंतु त्याबरोबरच आपल्याला असणा-या शंकाचे 'कायदा' व 'अनुभव' या दोन पैलूंच्या आधारे निरसन झाल्यास ज्ञानसंवर्धनाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते.
यासाठी तीन सादरीकरणांच्या रुपाने जमिनविषयक विविध वादांची मिमांसा करण्यात आली आहे. सदर तीनही सादरीकरणे ब्लॉगवर प्रकाशझोत(Presentation) या सदरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
२) महसूल कर्मचा-यांची प्रशिक्षणाद्वारे क्षमतावृद्धी :
महसूल प्रशासनात केवळ नायब तहसिलदार / तहसलिदार / उपजिल्हाधिकारी संवर्गांना सेवेत प्रवेश करतेवेळी ४५ दिवसांचे पायाभूत प्रशिक्षण यशदातर्फे दिले जाते. परंतु, लिपिक / तलाठी / मंडळ अधिकारी / कर्मचारी / अव्वल कारकून अशा संवर्गांना पायाभूत प्रशिक्षण मिळत नाही.
याचाच अर्थ असा की, कर्मचारी सेवेत आल्यावर त्यांना कामाची माहिती व कौशल्य आहे किंवा कसे याचा विचार करुन त्यांना प्रशिक्षण न देता त्यांच्यावर कामाची प्रत्यक्ष जबाबदारी सोपविण्यात येते. या संवर्गाचा विचार करता, पायाभूत प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आलेली ४ वेगवेगळी सादरीकरणे प्रकाशझोत या सदरात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment