Wednesday, November 23, 2011

सकाळ वर्तमानपत्रात 'मी अधिकारी' या सदरात प्रसिद्ध झालेला लेख....

एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्यात पहिला आलो.... शेखर गायकवाड

मी मूळचा शिरुर तालुक्यातील मलठणचा रहिवासी. माझे प्राथमिक शिक्षण श्रीगोंदा येथे झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात 'फर्ग्युसन' मध्ये झालं. नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठात एमएस्सी अग्री केलं. दरम्यानच्या कालावधीत शिवाजी विद्यापीठात समाजशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयात एम.ए. केलं. माझे वडील कृषी खात्यामध्ये नोकरी करत होते. महाविद्यालयीन दशेतच मी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होतो. त्यामुळेच मी एमपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात कृषिसेवा वर्ग-१ परिक्षेत राज्यात पहिला येण्याचा मान मिळविला. सुरवातीला माझी नियुकती कोल्हापूर येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सोलापूर, बारामती व हवेली येथे प्रांताधिकारी म्हणून काम केलं. १९९९ मध्ये मुख्यमंत्र्यांचा खाजगी सचिव म्हणून काम केलं. त्यातून अनेक गोष्टी शिकता आल्या. २००० मध्ये मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत झालो. २००५ मध्ये नाशिक येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून माझी निवड झाली. मी नाशिक जिल्ह्यात घरपोच धान्य योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी व लाभार्थींना अन्नधान्याचा योग्य पुरवठा होण्यासाठी ही योजना पथदर्शी व्हावी, हा यामागचा हेतू होता. रेशनचं धान्य दर महिन्याला मिळतं, मात्र यात बदल करुन तीन, सहा व बारा महिन्यांचे पैसे अगोदर भरल्यानंतर आदिवासींना धान्याचं पोतं देता येईल, अशी ही योजना होती. ६ जून २००७ मध्ये अलंगुण व सुरगाणा येथे या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेला इतका प्रतिसाद मिळाला, की ही योजना नाशिक जिल्ह्यात तब्बल ३१४ गावांमध्ये राबविण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातही या योजनेला यश आलं. म्हणूनच राज्य सरकारने 'राजीव गांधी गतिमानता पुरस्‍कार बहाल केला. सद्या ही योजना राज्यातील दहा जिल्ह्यांत चार हजार गावांत चालू आहे. २००९ मध्ये माझी यशदात रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती झाली. नंतर माझी २०१० मध्ये मुख्यमंत्र्यांचा सहसचिव म्हणून नियुक्ती झाली. यादरम्यानच्या काळात मी शेतक-यांनो सावधान!, फेरफार नोंदींची निर्गती - एक आदर्श कार्यपद्धती, गोष्टीरुप जमीन व्यवहार नीती, शेतीचे कायदे, महसूल अधिका-यांचे अर्धन्यायिक कामकाज याविषयी पुस्तकं लिहिली, तसेच विविध नियतकालिकांमध्ये लेखन केलं.

शब्दांकन : अरुण सुर्वे 

2 comments:

Rajashri Nimbalkar said...

सर, मी काल हा लेख वाचला. खुप आनंद झाला.

Sheetal Kachare said...

अभिनंदन सर! तुम्ही सहसचिव झाल्याचे तुमच्या या लेखाद्वारे समजले.

माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)

२९. महसुली शब्दकोश (२०२४)

३०. हक्कसोडपत्र बक्षिसपत्र मृत्युपत्र (२०२४)

३१. रंगमहसूली (२०२४)

३२. मराठी रंगभूमीवरील दोन अंकी नाटक...राजकारणातले राजकारण (२०२४)

३३. Scrutiny and Nominations Loksabha & Assembly Elections (२०२४)