सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सर्व टप्प्यांवर अधिक पारदर्शकता आणण्याची आवश्यकता लक्षात घेऊन घरपोच धान्य योजना, द्वारवितरण योजना इ. योजनांचा अभ्यास करुन शिफारशी करण्याकरिता शासनाने समिती गठीत केली होती.
सदर समितीने प्रामुख्याने अशी शिफारस केली आहे की, द्वार वितरण योजनेंतर्गत गरीब लोकांना घरपोच धान्य खात्रीने मिळत आहे, म्हणून अशा योजना संपूर्ण राज्यात राबविल्या जाव्यात. या समितीच्या शिफारशी व इतर अनुषंगिक बाबींचा विचार करुन सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत निर्धारित दराने व योग्य दर्जाचे धान्य शिधापत्रिकाधारकांना खात्रीशीररित्या उपलब्ध होईल याची हमी देण्याच्या उद्देशाने सुधारित धान्य वितरण पद्धत / प्रणाली राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला व दिनांक २३ फेब्रुवारी २०१२ रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने त्यासंबंधिचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सदर शासन निर्णयातील ठळक बाबी खालीलप्रमाणे -
१. धान्य वितरणाची सुधारित पद्धत
(अ) अन्न दिन
(ब) अन्न सप्ताह
२. घरपोच धान्य योजना
३. धान्याची आगाऊ उचल व वाटप
४. धान्य विक्रीची वेळ
५. प्रस्तावित नवीन वाहतूक पद्धत
६. सुधारित धान्य वितरण पद्धतीतील वाहतूक करणा-या वाहनांना स्वतंत्र रंग देणे
७. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत माहिती व दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर
(अ) GPS (Global Positioning System) यंत्रणा
(ब) Group SMS
८. अन्नधान्य वाहतूकीवरील खर्च
९. वित्तीय ठेव लेखा (P L A) आगाऊ खर्च करणे
१०. इतर मुद्दे
संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी क्लीक करा :
1 comment:
You might like this blog too
http://moklik.blogspot.in/2012/03/blog-post_28.html
Post a Comment