Watch Live : 2nd National Water AwardsWatch Live : 2nd National Water Awards PMO India Narendra Modi Vice President of India Gajendra Singh Shekhawat Zee News Press Information Bureau - PIB, Government of India Ministry of Home Affairs, Government of India Ministry of Rural Development, Government of India #NWA2019 #NWA #NAtionalWaterAwards #nationalwaterawards2019
Posted by Ministry of Jal Shakti, Department of Water Resources, RD & GR on Tuesday, 10 November 2020
शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असे मानना-या व ज्ञान संवर्धनासाठी एकत्र येणा-या सवंगडयांचा मेळावा (A place to meet and get informed for all those who believe that learning is an unending process)
मनोरंजक स्फूट लेखन
Wednesday, November 11, 2020
Watch Live : 2nd National Water Award 2019
Monday, October 19, 2020
Friday, September 18, 2020
Tuesday, September 15, 2020
नवीन पुस्तक प्रकाशित : महाराष्ट्राची भूजलगाथा
महाराष्ट्र राज्य हे भारत देशाचा मानबिंदू आहे.
इतिहास, कला, कृषी, व्यापार, शिक्षण असे कोणतेही क्षेत्र असो महाराष्ट्र हा कायमच
अग्रेसर राहिला आहे. मात्र भौगोलिक कारणांमुळे या राज्याला पाण्याच्या बाबतीत काही
मर्यादांना तोंड द्यावे लागते. स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात एक मोठा दुष्काळ
ठरलेल्या 1972 दुष्काळाने शेती, पाणी, रोजगार आणि स्थलांतराचे मोठे प्रश्न निर्माण
केले. महाराष्ट्राला प्राचीन काळापासून दुष्काळाला तोंड द्यावे लागले आहे. कृषी
क्षेत्रावर अवलंबून लोकसंख्येत वाढ; उत्पादनवाढीच्या गरजेतून सिंचनासाठी पाण्याची
वाढती मागणी, हवामान बदलामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळाचे संकट अधिकच
व्यापक होत गेले. महाराष्ट्र राज्यात ही
आव्हाने ओळखून 1972 साली भूजलाचे व्यवस्थापन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास
यंत्रणा यासारख्या शासकीय संस्थेची स्थापना झाली.
भूजल आणि दुष्काळ यांचा अनन्यसाधारण संबंध आहे.
किंबहुना शेती, पशुधन, ग्रामीण व शहरी लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज, भूजल
आणि दुष्काळ या सर्व घटकांचा एकमेकांशी गुंतागुंतीचा संबंध येतो. प्रस्तुत
पुस्तकाचा उद्देश हा संबंध समजून घेणे आणि भूजल व्यवस्थापनातून दुष्काळ
व्यवस्थापनाच्या वाटा सुकर करणे हा आहे. भूजल व्यवस्थापनासारखा गुंतागुंतीचा विषय
सोप्या पद्धतीने समजावा अशीच या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. शक्यतो तांत्रिक
बाबी आवश्यक तितक्याच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या
पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत श्री के. पी. बक्षी (माजी सनदी अधिकारी, अध्यक्ष
MWRRA), डॉ. आय. आय.
शाह (निवृत्त अतिरिक्त संचालक, भूसवियं, पुणे), डॉ. मिलिंद देशपांडे (भूसवियं, पुणे),
डॉ. हिमांशू कुलकर्णी, (वरिष्ठ
भूजलतज्ज्ञ, ॲक्वाडॅम, पुणे), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सर्व अधिकारी-कर्मचारी
वृंद यांच्याशी झालेल्या चर्चा, क्षेत्रभेटी, शासकीय अहवाल यातून हे पुस्तक आकाराला येत गेले. या सर्वांचे
मन:पूर्वक आभार!
या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात भारतातील जलसंपत्तीचा
विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात वेध घेण्यात आलेला आहे. दुसऱ्या प्रकरणात
महाराष्ट्रातील भौगोलिक संरचनांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आलेला आहे. भूजलाशी
संबंधित मुलभूत संकल्पना व महाराष्ट्रातील भूजलाच्या उपलब्धतेबाबत तिसऱ्या
प्रकरणात विवेचन केलेले आहे. दुष्काळ म्हणजे काय आणि भूजलाचा त्याच्याशी संबंध काय
याचा चवथ्या प्रकरणात विचार केलेला आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी भूजल
व्यवस्थापनाला पर्याय नाही. पाचवे प्रकरण लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाशी संबंधित
आहे. त्यात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही
भागांचा विचार केलेला आहे. आवश्यकतेनुसार काही उदाहरणेही दिलेली आहेत. तर शेवटचे
प्रकरण हे भविष्यातील आव्हानांचा विचार करणारे असे आहे.
असे
म्हणतात की तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठी होईल. चेन्नई शहरातील पाण्याची
आणीबाणी, महाराष्ट्रातील लातूर शहराला रेल्वेने पाणी द्यावे लागणे या घटना
भविष्यातील आव्हानांची नांदी आहेत. वेळेवर सावध होण्याचे शहाणपण आपण सर्वांनी
दाखवणे ही काळाची गरज आहे. प्रश्न समजून घेतला की उत्तराच्या शक्यता निर्माण करता
येतात. चला उत्तरे शोधूयात !
~*~
Thursday, September 10, 2020
Monday, March 16, 2020
अविस्मरणीय संध्याकाळ!!
...Shrirang Jadhav
उच्च पदस्थ सरकारी अधिकारी इतका मातीशी घट्ट जोडलेला असणे हे विरळाच!
Kalyan Taware दादांमुळे आर्याबाग या रत्न भांडाराचे दार खुले झाले आहे. दादा मनःपूर्वक धन्यवाद 🙏
कार्यक्रमाच्या सुंदर नियोजनासाठी आर्याबाग सांस्कृतिक कट्टा टीमचे अभिनंदन!!
Monday, March 9, 2020
Tuesday, February 18, 2020
News Published : Pune Municipal Corporation planning ‘freeways’ for two-wheeler riders’ safety
Saturday, February 15, 2020
Video : पुणे : मेट्रोचे जाळे पसरण्यासाठी लवकरच डीपीआर; आयुक्त शेखर गायकवाड
Thursday, January 30, 2020
Wednesday, January 22, 2020
Tuesday, January 21, 2020
ऊस पुरवठादार शेतकरी, कारखानदार, सर्वसामान्य नागरिक यांचेकरीता उपयुक्त माहितीपुस्तिका : एफ. आर. पी.
============================================
ऊसाच्या दरासंबंधी नेहमी वापरला जाणारा शब्द म्हणजे एफ. आर. पी.
...................या एफ. आर. पी. चा अर्थ काय? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो.
साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस पुरविणारे उत्पादक शेतकरी, पुरवठादार यांना त्यांनी पुरवठा केलेल्या ऊसापोटी साखर कारखान्यांनी द्यावयाची कायदेशीर किमान किंमत म्हणजेच Fair and Remunerative Price / एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर).
महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व सर्वांगिण ग्रामीण प्रगतीमध्ये साखर कारखानदारी व ऊस पुरवठादार यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे. सर्वसाधारणपणे राज्यात दरवर्षी रुपये २१ ते २४ हजार कोटी इतकी एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) महाराष्ट्रातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना कारखान्याकडून दिली जाते. या उदयोगातील शेतकऱ्यांची संख्या साधाणत: ३० लाख असून सभासद संख्या २० लाख इतकी आहे. एफ. आर. पी. ची रक्कम कारखान्याने वेळेवरती देण्यासाठी साखर आयुक्तालयास समन्वय, कायदेशीर उपाय व सनियंत्रण करावे लागते. राज्यातील ऊस पुरवठादारांना त्यांच्या तक्रारींची दाद कोठे व कशी मागावी याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे.
याकरीता ऊस पुरवठादार शेतकरी, कारखानदार, सर्वसामान्य नागरिक यांना उपयुक्त अशी एफ. आर. पी. माहितीपुस्तिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये एफ. आर. पी. म्हणजे काय, त्यातील कायदेशीर तरतूदी, महसूली विभागणी सुत्रानुसार दर (RSF) म्हणजे काय? यासंदर्भात शेतकऱ्यांनी लक्षात ठेवण्यासारख्या बाबी तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे पत्ते व संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.
माझी प्रकाशित पुस्तके
१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )
२ . फेरफार नोंदी (१९९९ )
३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )
४. शेतीचे कायदे (२००५ )
५. महसूल अधिका-यांचे अर्धन्यायिक कामकाज (२००७ )
६ . शेतक-यांनो...जमिनी सांभाळा! (२०१०)
७ . कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा (२०१०)
८ . Home Delivery Scheme of Foodgrains (२०१०)
९. घरपोच धान्य योजना (२०१०)
१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)
२०. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)
२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)
२२. Beyond Competition(२०२०)
२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)
२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)
२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)
२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)
२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)
२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)
२९. महसुली शब्दकोश (२०२४)
३०. हक्कसोडपत्र बक्षिसपत्र मृत्युपत्र (२०२४)
३१. रंगमहसूली (२०२४)
३२. मराठी रंगभूमीवरील दोन अंकी नाटक...राजकारणातले राजकारण (२०२४)
३३. Scrutiny and Nominations Loksabha & Assembly Elections (२०२४)