Wednesday, September 22, 2021

Book Published : साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम

इथेनॉल या नव्या क्षेत्रासंबंधी सामान्य शेतकऱ्यांना व उद्योजकांना अद्यावत माहिती देणारे हे पुस्तक माननीय शरद पवारांच्या हस्ते प्रकाशित...

 परंपरागत सी हेवी मळापासून, थेट ऊसाच्या रसापासून, मका /  तांदूळ यांसारख्या निकृष्ट अन्नधान्यापासून, साखरेच्या पाकापासून इथेनॉल निर्मिती करुन २०२५ सालापर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. अशावेळी शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीमुळे एफ आर पी वर काही परिणाम होईल का? हे सोप्या भाषेत सांगणारे नवे पुस्तक माननीय शरद पवारांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

 

 




 

New Book : साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम.

परंपरागत सी हेवी मळापासून, थेट ऊसाच्या रसापासून, मका /  तांदूळ यांसारख्या निकृष्ट अन्नधान्यापासून, साखरेच्या पाकापासून इथेनॉल निर्मिती करुन २०२५ सालापर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. अशावेळी शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीमुळे एफ आर पी वर काही परिणाम होईल का? हे सोप्या भाषेत सांगणारे नवे पुस्तक साखर आयुक्तालयामार्फत प्रसिद्ध.


Conference Hall Inaugural of West Indian Sugar Mills Association (WISMA)

 


Friday, April 9, 2021

‘महाराष्ट्रातील जमीनविषयक कायदे’ या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची मुलाखत...

 


माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेअंतर्गत ‘महाराष्ट्रातील जमीन विषयक कायदे’ या विषयावर राज्याचे साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्युज ऑन एअर या ॲपवरून शुक्रवार दि. ९, शनिवार दि. १० आणि सोमवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. शिल्पा नातू यांनी या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन केले आहे.

थोर योद्ध्यांची, संतांची व समाजसुधारकांची परंपरा असणाऱ्या व विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्य निर्मितीची पूर्ण झालेली 60 वर्षे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष हा सुवर्णयोग साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेची’ सुरुवात 19 मार्चपासून करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या 60 वर्षांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने 19 मार्च ते 1 मे 2021 दरम्यान ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत.

‘कसेल त्याची जमीन’ हे तत्व घेऊन आलेला कूळ कायदा, हजारो बेघर व भूमिहीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमीन मिळवून देणारा ‘कमाल जमीन धारणा’ कायदा आदी जमीन कायद्यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक स्थित्यंतरात मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या व्याख्यानमालेत केले आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्रातील जमीन विषयक कायदे’ या विषयावर श्री. शेखर गायकवाड यांची दिलखुलास कार्यक्रमातून ही व्याख्यानमाला प्रसारित होणार आहे.

Tuesday, March 23, 2021

Broadcast महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला - 'महाराष्ट्रातील जमीन विषयक कायदे'



महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) Tweeted:

थेट प्रसारण: महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला: महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे 'महाराष्ट्रातील जमीन विषयक कायदे' या विषयावर चौथे पुष्प गुंफत आहेत. 

 @micnewdelhi
@MahaMicHindi 

 



माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)

२९. महसुली शब्दकोश (२०२४)

३०. हक्कसोडपत्र बक्षिसपत्र मृत्युपत्र (२०२४)

३१. रंगमहसूली (२०२४)

३२. मराठी रंगभूमीवरील दोन अंकी नाटक...राजकारणातले राजकारण (२०२४)

३३. Scrutiny and Nominations Loksabha & Assembly Elections (२०२४)